---Advertisement---

ना विराट ना रोहीत हाच पठ्ठ्या टी20 चा सर्वोत्तम खेळाडू; इंग्लंडच्या दिग्गज कर्णधाराकडून कौतुकाची थाप

On: मंगळवार, नोव्हेंबर 17, 2020 1:17 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलची तीनही प्रकारच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी वनडे मालिकेचा पहिला सामना सिडनी येथे खेळला जाईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी केएल राहुलचे कौतुक केले आहे.

केएल राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाब आयपीएल 2020 मध्ये प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. मात्र असे असूनही केएल राहुलने हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. राहुलची प्रशंसा करताना नासिर हुसेन म्हणाले की, “राहुल सध्या वनडे आणि टी20 क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.”

राहुल सहजतेने फटकेबाजी करतो. यावर बोलताना हुसेन म्हणाले की, “क्रिकेटमध्ये मोठे बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी तो एक आदर्श आहे. खेळताना अचूक पद्धतीने फटके कसे मारायचे हे तरुण खेळाडू राहुलकडून शिकू शकतात.”

राहुलने 14 सामन्यांत 55.83 च्या सरासरीने 129.34 च्या स्ट्राईक रेटसह 670 धावा केल्या, ज्यामध्ये नाबाद 132 ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. आयपीएलमधील भारतीय खेळाडूची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्यादेखील आहे.

नासिर हुसेन यांनी त्यांच्या आयपीएल 2020 च्या प्लेयिंग इलेव्हनमध्येही राहुलची निवड केली होती. दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा फलंदाज शिखर धवन याला हुसेन यांनी राहुलचा सलामीवीर साथीदार म्हणून निवडले होते. धवनने आयपीएलच्या 17 सामन्यांत 618 धावा केल्या आहेत. राहुलनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

“या दोन सलामीवीर खेळाडूंना खेळताना पाहून प्रसन्न वाटते. टी20 या प्रकारात मोठे फटके खेळावे लागते. धवन आणि राहुल यांच्यासाठी हा हंगाम शानदार होता.”असेही पुढे बोलताना हुसेन म्हणाले.

तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन टी20, तीन वनडे आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी राहुलला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सिडनी येथे 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वनडे सामन्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाच्य ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

इरफान पठाण ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या संघाकडून खेळणार क्रिकेट, तेही भारतात नाही तर…

हिंदू देवतेची पूजा केली म्हणून बांगलादेशी क्रिकेटपटूला आली जीवे मारण्याची धमकी

विराटऐवजी दुसरा कर्णधार असता तर बेंगलोरने विजेतेपद मिळवले असते का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

ट्रेंडिंग लेख –

क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने १० वर्षांपूर्वी केले होते दुसरे त्रिशतक, पाहा दोनदा त्रिशतक करणारे अन्य तीन खेळाडू

आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला

धन्यवाद आणि गुडबाय! सचिन बोलत होता अन् वानखेडेवर चाहते रडत होते…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---