---Advertisement---

पाकिस्तानी कर्णधाराला बॉल आउटचा नियमच माहित नव्हता; भारतीय अष्टपैलू खेळाडूचा खुलासा

---Advertisement---

मुंबई । जेव्हा जेव्हा 2007 च्या टी -20 विश्वचषकाचा उल्लेख येतो तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेल्या अंतिम सामन्याची आठवण येते. एमएस धोनीच्या नेतृत्वात पाकिस्तानला पराभूत करून टीम इंडिया “वर्ल्ड चॅम्पियन’ बनली. परंतु या विश्वचषकातील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता, ज्याचा निर्णय बॉल-आउटने घेतला. कारण सामना बरोबरीत सुटला होता.
13 वर्षांनंतर भारताचा अष्टपैलू इरफान पठाणने सांगितले की, ‘पाकिस्तान संघाचा तत्कालीन कर्णधार शोएब मलिकला त्यावेळी बॉलआऊटबद्दल माहिती नव्हती.’
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात इरफान म्हणाला की, “पाकिस्तानच्या कर्णधाराने पत्रकार परिषदेत कबूल केले होते की त्याला बॉल आउटची माहिती नव्हती. बॉलआऊट दरम्यान, पाकिस्तानच्या गोलंदाजांना रनअप पूर्ण घ्यायचा की अर्धा याबद्दल कल्पना नव्हती. त्याच वेळी, दुसरीकडे आम्ही त्यासाठी तयार होतो. आणि त्याचा परिणाम समोर आहे.”
त्या सामन्यात भारताने रॉबिन उथप्पाच्या अर्धशतकाच्या जोरावर 141/9 धावा केल्या. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती, परंतु त्यानंतरच्या फलंदाजांनी डाव हाताळला आणि अखेर सामना बरोबरीत आणण्यात यश मिळविले.
बॉल आऊट झाल्यावर सर्व भारतीय खेळाडू हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि रॉबिन उथप्पाने यष्टीला चेंडू मारले. पण कोणताही पाकिस्तानी गोलंदाज असे करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि भारतीय संघाने तो सामना जिंकला. उमर गुल, यासिर अराफात आणि शाहिद आफ्रिदी हे तीन पाकिस्तान खेळाडू तीनही विकेट्स हिट करण्यास असमर्थ ठरले.
वास्तविक, त्यावेळी  टी -20 सामना टाय झाला तर बॉलआऊटद्वारे निर्णय होईल, असा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियम बनवला होता. भारत-पाकिस्तान सामन्यातही असेच घडले होते, जेव्हा भारताने नऊ गडी गमावून 141 धावा केल्या होत्या आणि पाकिस्तानच्या संघानेही समान धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत सामन्याचा निकाल बॉलआऊटमध्ये झाला आणि भारताने हा सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---