---Advertisement---

केवळ जम्मू काश्मिर क्रिकेट टीमचा मेंटाॅर होण्यासाठी इरफानने सोडले होते ३ मोठे करार

On: रविवार, मे 10, 2020 2:40 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या जम्मू काश्मिर संघाचा मेंटाॅर म्हणून काम पहात आहे. इरफानने काल एका लाईव्ह चाट शो दरम्यान खुलासा केला की, जम्मू काश्मिर संघाचा मेंटाॅर होण्यासाठी त्याने तीन मोठे करार नाकारले होते.

यात त्याने कॅरेबियन प्रीमीयर लीगमधील एक संघ व टी१० लीगमधील एक संघाकडून त्याला मोठ्या ऑफर असल्याचे सांगितले. तसेच एका संघाचे नाव सांगण्यास त्याने नकार दिला. परंतु या तीनही मोठ्या करारांवर पाणी सोडत त्याने जम्मू काश्मिर रणजी संघासोबत काम करण्याला प्राधान्य दिले.

२०१७ दरम्यान मला निवृत्ती घ्यायची होती. परंतु काही नियम समजून घेण्यासाठी मी बीसीसीआयच्या चकरा मारत होतो. त्यावेळी मला वाटले की, जम्मू काश्मिर क्रिकेटची सेवा करण्यापेक्षा जास्त चांगले काही असू शकत नाही. त्यांना माझी गरज आहे, असेही यावेळी इरफान म्हणाला.

इरफानच्या दोन वर्षांच्या काळात जम्मू काश्मिर क्रिकेटमध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. तसेच संघ एका वेगळ्याच उंचीवर गेला.

इरफान भारताकडून २९ कसोटी, १२० वनडे व २४ टी२० सामने खेळला आहे. २००३ मध्ये पदार्पण केलेल्या इरफानने २०१२मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---