भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दीर्घकाळापासून कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झगडत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याची बॅट शांतच आहे. रोहितच्या फलंदाजीवर जोरदार टीका होत आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने रोहितबद्दल मोठी गोष्ट सांगितली आहे. पठाणचा विश्वास आहे की रोहित केवळ कर्णधार असल्यामुळे प्लेइंग-11 मध्ये आहे कारण त्याच्या सध्याच्या फॉर्मच्या आधारावर त्याला खेळण्याची संधी मिळत नाही. तसेच इरफानने स्टार फलंदाज विराट कोहलीला आपला ‘लोभ’ सोडण्याचा सल्लाही दिला. ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर होणार आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना पठाण म्हणाला, “एक खेळाडू ज्याने जवळपास 20,000 धावा केल्या आहेत. तरीही रोहित आता ज्या प्रकारे संघर्ष करत आहे, असे दिसते की त्याचा फॉर्म त्याला अजिबात साथ देत नाही. आता काय होतंय की तो कर्णधार आहे म्हणून खेळतोय. जर तो कर्णधार नसता तर कदाचित तो आत्ता खेळला नसता. त्याजागी केएल राहुल शीर्षस्थानी यशस्वी जयस्वाल सोबत खेळला असता.
माजी अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, “जर आपण वास्तविक बोलाययचे झाले तर, तो ज्या प्रकारे बॅटने झगडत आहे. त्याचा विचार केला तर कदाचित त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही. पण तो कर्णधार असल्यामुळे आणि पुढचा सामना जिंकून तुम्हाला मालिकेत बरोबरी साधायची आहे. त्यामुळे रोहित गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. या वर्षी, बांग्लादेशविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत त्याला चार डावांत केवळ 42 धावा करता आल्या आणि न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांत त्याला केवळ 91 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याने आतापर्यंत पाच डावात 31 धावा केल्या आहेत. त्यापैकी चार डावात तो एक अंकी धावांवर बाद झाला आहे.
हेही वाचा-
IND vs AUS; यशस्वी जयस्वाल नाबाद होता! बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला उघड पाठिंबा
पॅट कमिन्स इतिहास रचण्यापासून एक विजय दूर, 2 वर्षात चौथे मोठे विजेतेपद उंचावणार
IND vs AUS: विराट कोहली-रोहित शर्मा निवृत्त होणार! माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी