---Advertisement---

वयाच्या ३०व्या वर्षी इरफानला संघातून घरचा रस्ता दाखविणाऱ्या त्या व्यक्तींवर

On: रविवार, मे 10, 2020 3:10 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने कोणताही संवाद न साधता त्याला भारतीय संघातून वगळण्यात आल्याने भारतीय संघाच्या निवड समीती सदस्यांवर निशाणा साधला आहे. त्याने सुरेश रैनाबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर बोलताना निवड समीतीवर टिका केली.

तो म्हणाला, ‘निवड समीतीने मला ३० व्या वर्षीच ‘बुढ्ढा’ बनवले. माझ्याशी बोर्डकडून आणि निवडकर्त्यांकडून कोणताही संवाद साधण्यात आला नाही.’

इरफानने २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड येथे कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना वयाच्या २३ व्या वर्षी २००८ ला खेळला. तर २०१२ ला तो शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना भारताकडून खेळला. इरफानने जानेवारी २०२०मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

तसेच त्याने रैनाशी बोलताना असेही सांगितले की जर निवड समीतीकडून संवाद साधण्यात आला तर तो आत्ताही निवृत्तीतून माघार घेऊ शकतो.

तो म्हणाला, ‘संवाद खूप महत्त्वाचा आहे. जर त्यांनी मला येऊन सांगितले की ‘इरफान तू निवृत्त झाला आहे पण तूला १ वर्ष देतो तयारी करायला आणि तू मग भारतीय संघात निवडीसाठी उपलब्ध असशिल. तर मी सगळ काही सोडून खूप मेहनत करेल. पण संवाद साधणार कोण?’

https://www.instagram.com/p/B_98cQLhySs/

इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, वनडेत १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.

तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा तसेच जम्मू आणि काश्मिर संघाकडून खेळला. त्याने जम्मू आणि काश्मिर संघाकडून खेळताना संघाच्या मार्गदर्शकाची भूमिकाही निभावली.

इरफानने भारताच्या अनेक मोठ्या विजयामध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे. तो २००७ च्या टी२० विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

विराटकडून झेल सुटल्यावर धोनी म्हणाला, बेटा; मुर्ख दुसऱ्या कुणाला बनव

श्रीलंकेपाठोपाठ हे क्रिकेट बोर्ड म्हणतं, आयपीएल आमच्या देशात घ्या

भारताचा एकेवेळचा शेर गोलंदाज करतोय कमबॅकचा विचार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---