राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023चा 37वा सामना पार पडला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान संघाने 32 धावांनी शानदार विजय मिळवला. संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नईला गुणतालिकेतील पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी पोहोचवले आणि स्वत: अव्वलस्थान काबीज केले. या विजयानंतर भारतीय संघाचा दिग्गज माजी अष्टपैलू इरफान पठाण याने संजू सॅमसनचे कौतुक केले. तसेच, त्याला महेंद्र सिंग धोनी याच्यापेक्षा चांगले कर्णधार म्हटले.
काय म्हणाला इरफान पठाण?
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर राजस्थान संघ 8 सामन्यांतील 5 विजय आणि 3 पराभवांनंतर गुणतालिकेत 10 गुणांसह अव्वलस्थानी आहे. तसेच, प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यासाठी राजस्थानने दावा ठोकला आहे. दुसरीकडे, चेन्नईविरुद्ध कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याचे नेतृत्व पाहून भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने संजूची जोरदार प्रशंसा केली.
संजूसाठी गौरवोद्गार काढत सॅमसन म्हणाला की, “संजू सॅमसन एक चांगला कर्णधार होता आणि त्याने एक अशा कर्णधारावर एक गुण मिळवला, ज्याच्याकडे पूर्ण अनुभव आहे. त्याने आपल्या तीन फिरकीपटूंना चांगल्याप्रकारे बदलले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही.”
चेन्नईचा दारुण पराभव
राजस्थानने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 202 धावा चोपल्या. यामध्ये यशस्वी जयसवाल याच्या 43 चेंडूत 77 धावांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ध्रुव जुरेल याने 34, तर देवदत्त पडिक्कल याने नाबाद 27 धावांचे योगदान दिले होते. राजस्थानच्या या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची खराब सुरुवात झाली. शानदार फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर डेवॉन कॉनवे 16 चेंडूत 8 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर ऋतुराज गायकवाड 47 धावा करून बाद झाला. तसेच, शिवम दुबे याने 33 चेंडूत 52 धावांची खेळी साकारली. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना संघाला अपयश आले. चेन्नईने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 170 धावाच केल्या. त्यामुळे राजस्थानला या सामन्यात 32 धावांनी विजय मिळवण्यात यश आले. या सामन्यातील कामगिरीसाठी जयसवाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी बनला.
A 32-run win over #CSK propels @rajasthanroyals to the 🔝 of the Points Table 👏 👏@ybj_19 is the Player of the Match for his important knock 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/LoIryJ4ePJ#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/uupcVq82mT
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2023
राजस्थान संघाचा पुढील सामना मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना 30 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडिअम येथे पार पडणार आहे. (irfan pathan statement on sanju samson take a look here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Impact Player नियमाबद्दल गावसकर नाराज; फलंदाजांना लाख मोलाचा सल्ला देत म्हणाले, ‘नो फिल्डिंग…’
IPL 2019मध्ये धोनीच्या मैदानावरील जाण्याविषयी माजी सहकाऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘त्याला पश्चाताप…’