भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याबाबत माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने आपले मत मांडले आहे.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान याने स्टार स्पोर्ट्स चॅनेलवरील ‘फॉलो द ब्ल्यूज’मध्ये म्हटले की, “मी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीच याबाबत भाष्य केले होते. माझ्या मते भारतीय संघात आणखी एक फलंदाज असायला हवा होता. भारतीय संघात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची कमतरता जाणवली. जे न्यूझीलंड संघाकडे होते. असे अष्टपैलू खेळाडू शोधणे खूप कठीण आहे.”(Irfan Pathan statement on WTC final)
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर आपण या सामन्याबद्दल बोलाल तर, पहिला डाव चांगला गेला. परंतु दुसऱ्या डावात भारतीय संघातील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. तसेच दुसऱ्या डावात चेंडू स्विंग देखील झाला नव्हता. परंतु भारतीय फलंदाज आणखी चांगली फलंदाजी करू शकले असते.”
भारतीय फलंदाजांवर केली टीका
तसेच तो पुढे म्हणाला की, “भारतीय फलंदाज बाऊन्सर चेंडूवर बचाव करण्याऐवजी पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होते. ते फलंदाजांना कठीण प्रश्न विचारत होते. परंतु भारतीय फलंदाजांमध्ये जबाबदारीची कमतरता जाणवली होती. मला विश्वास आहे की, भविष्यात ते गोलंदाजांना उत्तर देण्यात यशस्वी ठरतील. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी २ बाद १४० धावा केल्या होत्या. तर १४० धावांवर भारतीय संघाचे ८ फलंदाज माघारी परतले होते.”
दुखापतीमुळे हार्दिक गोलंदाजी करु शकत नव्हता. त्यामुळे संघ निवडकर्त्यांनी वेगवान अष्टपैलू हार्दिकची निवड केली नव्हती.
येत्या ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामान्यांची मालिका खेळायची आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसेच हि मालिका विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील पहिली मालिका असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
धोनीसाठी मीच काय कोणीही बंदुकीची गोळी खाईल; पाहा कोणी केलीय ‘कॅप्टनकूल’ची एवढी स्तुती
भारताचा ‘हुकुमी एक्का’ इंग्लंडविरुद्ध खेळण्याची शक्यता, दुखापतीविषयी अपडेट आली पुढे
पुजाराचे इग्लंडविरुद्ध कसोटीत बाकावर बसणे निश्चित? दिग्गजाने सुचवला त्याचा उत्तम ‘पर्याय’