सध्या भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) चर्चेचा विषय बनला आहे. तो सध्या राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि निवृत्तीच्या कारणाने चर्चेत आहे. काही अहवालांनुसार सांगितलं जातंय की, हरभजन सिंग आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या आधी आयपीएलमधून निवृत्ती घेऊन एका संघासोबत सपोर्ट स्टाफ म्हणून जॉईन होईल. याच चर्चांदरम्यानच हरभजन सिंग माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणसोबत (Irfan Pathan) ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये दिसून आला आहे.
‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोचा एक ट्रेलर सोशल मीडियावर वायरल होतोय, ज्यात हरभजन सिंग दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) उर्फ बिग बी (Big B) यांना गोलंदाजी करताना दिसत आहे. तो गोलंदाजी करत असताना इरफान पठाणने कॉमेंट्री करत त्याची फिरकी घेतली. तो कॉमेंट्री करताना म्हणाला, “बच्चन जी यांच्याकडून हरभजनची मस्त धुलाई होणार आहे.” हे ऐकताच हरभजन हैराण होऊन इरफानकडे बघत होता.
हरभजन सिंग आणि इरफान पठाण दोघांनी सोशल मीडियावर क्लिप शेअर केली. यात इरफान कॉमेंट्री करताना म्हणतो, “हरभजन आता गोलंदाजी करणार आहे आणि बच्चन जी त्याच्या समोर खूप धावा करणार आहेत.” हरभजन नंतर अमिताभ बच्चन यांना चेंडू टाकतो आणि बच्चन तो चेंडू खेळतात आणि सगळे जण चौकार मारल्याचं सांगतात.
#KBC13 ke manch pe AB sir ne lagaaye apne balle se chauke aur chakke,Harbhajan Singh ki pitaai or hamari commentary,Dekhiye iss entertaining pal ko #KaunBanegaCrorepati ke #ShaandaarShukriya week mein, Mon-Fri, raat 9 baje, @SonyTV @SrBachchan @harbhajan_singh pic.twitter.com/egGdx4HKMN
— Irfan Pathan (@IrfanPathan) December 17, 2021
अमिताभ बच्चनसुद्धा चौकार मारल्याचं सांगतात आणि म्हणतात, ‘क्या बात है! मी चौकार मारला.’ यावर इरफान पुढे म्हणतो, “इतकी उत्कृष्ट फलंदाजी सुरु आहे की पार चेंडूचे धागे दोरे निघाले.” पुढच्या चेंडूवर बच्चनजी मोठा फटका मारून आनंद साजरा करतात. यावर हरभजन म्हणतो की, “मी माझ्या कारकिर्दीत काही दिग्गज फलंदाजांना आऊट केलं, पण त्या यादीत तुमचं पण नाव आलं असतं तर मला निवृत्ती घेताना अजून आनंद झाला असता.”
हरभजनने अद्याप निवृत्तीची अधिकृत घोषणा केलेली नाही. तो शेवटचे आयपीएल २०२१ हंगामात खेळताना दिसला होता. इरफानने मात्र यापूर्वीच निवृत्ती घोषित केलेली असून तो आता समालोचन करताना अनेकदा दिसतो.
महत्त्वाच्या बातम्या-
- थरारक! ऍडलेड कसोटीदरम्यान वीजांचा कडकडाट, पंचासह खेळाडूही घाबरले
- दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ‘किंग कोहली’ची बॅट तळपणार? पाहा यापूर्वीची आकडेवारी
- गांगुली म्हणतोय, ‘पदार्पणात चांगली कामगिरी असली, तरी श्रेयस अय्यरची खरी परिक्षा…’