अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात निकाली ठरला. दोन्ही संघांपैकी एकाही संघाने या सामन्यात १५० धावांचा टप्पाही ओलांडला नाही. दोन्ही संघाच्या फिरकीपटूंनी या सामन्यात फलंदाजांना तालावर नाचवले. त्यामुळे हा सामना अतिशय कमी धावसंख्येचा ठरला.
मात्र आता त्यामुळे अहमदाबादच्या खेळपट्टीवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक माजी खेळाडूंनी ही खेळपट्टी निकृष्ट दर्जाची होती, असे टीकास्त्र डागले आहे. कसोटी क्रिकेटसाठी ही खेळपट्टी अयोग्य दर्जाची होती, असे मत अनेकांनी मांडले आहे. यात केवळ इंग्लंडच्याच माजी खेळाडूंचा नाही तर भारताच्याही माजी खेळाडूंचा समावेश आहे.
आयसीसीचे नियम काय सांगतात?
मात्र याबाबत आयसीसीचे नियम काय सांगतात, हे यावेळी जाणून घेणे महत्वाचे ठरेल. आयसीसीच्या नियमांनुसार त्या खेळपट्टीला खराब ठरवले जाते, ज्यावर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात समान सामना होत नाही. जर एखाद्या खेळपट्टीवर फलंदाज सहजतेने धावा करत असतील आणि गोलंदाजांना काहीही मदत मिळत नसेल, तर अशी खेळपट्टी खराब म्हणून घोषित केल्या जाते.
त्याचवेळी, उलट पद्धतीच्या मामल्यातही हा नियम लागू आहे. जर एखाद्या खेळपट्टीवर गोलंदाजांना अधिक मदत मिळत असेल, पण फलंदाजांना कसलीही संधी नसेल, तर ती खेळपट्टी देखील आयसीसीच्या नियमांनुसार खराब म्हणून जाहीर केल्या जाते. तसेच वेगवान गोलंदाजांना किंवा फिरकी गोलंदाजांनाच विशेषकरून मदत करणारी खेळपट्टीही खराब या श्रेणीत मोडते.
फिरकी गोलंदाजांच्या बाबतीत जर पहिल्या दिवसापासूनच चेंडूला अधिक फिरकी मिळायला सुरुवात झाल्यास, ती खेळपट्टी वाईट दर्जाची ठरते. मात्र आशियातील खेळपट्ट्यांना याबाबत काहीशी सूट आहे. येथे चेंडू अधिक फिरणार हे अपेक्षितच असते. मात्र जर यासह चेंडूला असमान उसळीपण मिळत असेल तर मात्र ती खेळपट्टी खराब ठरवल्या जाते.
यापूर्वी आयसीसीने २०१८ साली दक्षिण आफ्रिकेतील वांडरर्सच्या खेळपट्टीला खराब खेळपट्टी म्हणून घोषित केले होते. त्यांनतर मात्र अजून कोणत्याही खेळपट्टीला अशी श्रेणी मिळाली नाहिये. आता अहमदाबाद कसोटीच्या खेळपट्टीबाबत आयसीसी काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
दोन दिवसात कसोटी जिंकताच ट्विटरवर भारतीय संघासाठी आला कौतुकाचा पूर, पाहा काही हटके ट्विट
साल २०११ च्या विश्वचषकानंतर कारकिर्द संपुष्टात आलेले ३ भारतीय क्रिकेटर






