---Advertisement---

बाबर आजमचे परत येणार चांगले दिवस? PCBच्या बदललेल्या भूमिकेमुळे आशिया कपमध्ये मिळू शकते पुनरागमनाची संधी!

On: मंगळवार, ऑगस्ट 5, 2025 6:55 PM
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Icc champions trophy) नंतर पाकिस्तान संघात मोठा बदल करण्यात आला होता. ज्यामध्ये दिग्गज फलंदाज बाबर आजम (Babar Azam), यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohmmed Siraj) आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) यांना संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, नंतर शाहीन शाह आफ्रिदीने पुनरागमन केलं, पण बाबर आजम आणि मोहम्मद रिझवानला अद्याप संधी मिळालेली नाही. आता मात्र काही रिपोर्ट्सनुसार बाबर आजमसाठी पुन्हा चांगले दिवस परत येताना दिसत आहेत. सध्या PCB (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) आपल्या भूमिकेत बदल करत असल्याचं समोर आलं आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान सलामी फलंदाज फखर झमान जखमी झाला होता, त्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. रिपोर्ट्सनुसार PCBने त्याला आता नॅशनल क्रिकेट अकादमीत (NCA) जाऊन फिटनेसवर काम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता सलामी फलंदाजाची एक जागा रिकामी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बाबर आजमला बॅकअप प्लॅन म्हणून पाहिले जात आहे.

संघाला एक असा अनुभवी फलंदाज हवा आहे जो टी20 फॉरमॅटमध्ये तरुण खेळाडूंना साथ देत फलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकेल. रिपोर्ट नुसार, जर बाबर आजम वनडे मालिकेत चांगली कामगिरी करतो, तर त्याचं टी20 संघात लवकरच पुनरागमन होऊ शकतं.

पाकिस्तानने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध 2-1 अशी टी20 मालिका जिंकली आहे. आता पाकिस्तानची टीम अफगाणिस्तान आणि यूएईसोबत एक त्रिकोणी मालिका खेळणार आहे. बाबर आजम याच मालिकेद्वारे पुनरागमन करू शकतो. त्यानंतर तो आशिया कप 2025 मध्येही पाकिस्तानकडून खेळू शकतो.

बाबर आजमने टी20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 128 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 39.83 च्या सरासरीने 4223 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे 3 शतकं आणि 36 अर्धशतकं आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---