आयपीएल 2025 मध्ये, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर 32वा सामना खेळला गेला. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 188/5 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, राजस्थानला 20 षटकांत फक्त 188 धावा करता आल्या आणि सामना बरोबरीत सुटला. सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून लागला. ज्यामध्ये अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्लीने शानदार विजय मिळवला. (DC Won The Match Against RR For Super Over)
आता दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील सुपर ओव्हरपूर्वी राजस्थान संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही चाहते प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात मतभेद झाल्याचा अंदाज लावत आहेत. व्हिडिओमध्ये, राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक सुपर ओव्हर सुरू होण्यापूर्वी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी चर्चा करताना दिसत आहेत. सॅमसन डगआउटजवळ फिरत होता. जेव्हा एका खेळाडूने संजू सॅमसनला चर्चेत भाग घेण्यास सांगितले तेव्हा संजूने हाताने इशारा करून सामील होण्यास नकार दिला.
यानंतर, संजू सॅमसनच्या चाहत्यांना वाटले की द्रविड आणि कर्णधार यांच्यात सर्व काही ठीक नाही. काही चाहत्यांनी संजूला चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होण्याचा विचार करण्याचा आग्रहही केला. आता द्रविडने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजस्थान रॉयल्स संघातील मतभेदाच्या अफवांना द्रविडने फेटाळून लावत म्हटले की, “संजू आणि माझ्यामध्ये सर्व काही ठीक आहे. अशा बातम्यांना काही अर्थ नाही. कोणताही गैरसमज किंवा वाद नाही. प्रत्येकजण एका संघाप्रमाणे स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत आहे.”