दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी (१ मे) रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर ४ गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने ८७ धावांची तुफानी खेळी करत सामना मुंबई इंडियन्स संघाच्या दिशेने वळवला. परंतु या सामन्यानंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रॅड हॉगने मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजाच्या खेळाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने तुफानी खेळी केली होती. त्याने नाबाद ८७ धावांची खेळी केली होती.
तसेच मुंबई इंडियन्सं संघाला शेवटच्या षटकात १६ धावांची आवश्यकता असताना लुंगी एन्गिडीने पहिला चेंडू नीर्धाव टाकला होता. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवर पोलार्डने सलग दोन चौकार लगावले होते. त्यापुढील चेंडूवर पोलार्डने मुद्दाम एकही धाव घेतली नव्हती. तसेच शेवटी २ चेंडूत ८ धावांची आवश्यकता असताना पोलार्डने षटकार लगावला होता आणि शेवटच्या चेंडूवर २ धावांची आवश्यकता काढत सामना मुंबई इंडियन्स संघाला जिंकून दिला.
Sorry again for my harp. Last night last ball 2 runs needed and the non striker again taking advantage. Is this in the spirit of the game. #IPL2020 #MIvsCSK pic.twitter.com/HDEwqfSclg
— Brad Hogg (@Brad_Hogg) May 2, 2021
ब्रॅड हॉगने उपस्थित केला प्रश्न
शेवटच्या चेंडूवर जेव्हा मुंबई इंडियन्स संघाला २ धावांची आवश्यकता होती. तेव्हा नॉन स्ट्राइकला असलेला फलंदाज, धवल कुलकर्णी हा क्रिजच्या बाहेर उभा होता. हाच फोटो ट्विट करत ब्रॅड हॉगने लिहिले की, “पुन्हा तीच गोष्ट म्हणत आहे. यासाठी माफी असावी. रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २ धावांची आवश्यकता होती. नॉन स्ट्राइकला उभा असलेल्या फलंदाजाने याचा फायदा घेतला होता. तो क्रिजच्या बाहेर उभा होता. हे योग्य आहे का?” असा सवाल ब्रॅड हॉग यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या कर्णधारासह हैदराबादचा होणार ‘सनराईज’, पाहा विलियम्सन आणि सॅमसनचे संघ?
कृणालच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे चेंडू सीमापार, मग काय गोलंदाज बोल्टचा चढला पारा; बघा व्हिडिओ