---Advertisement---

वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी तयार आहे का? कुमार संगकारांनी दिले स्पष्ट आणि थेट उत्तर

On: शनिवार, मे 30, 2026 11:24 AM
---Advertisement---

आयपीएल २०२६ मध्ये स्फोटक लक्षवेधी फलंदाजी करणारा वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी किती तयार आहे हा प्रश्न क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. अनेक दिग्गज आणि तज्ज्ञांनी त्याला शक्य तितक्या लवकर भारतीय संघात सामील करून घेण्याची मागणी केली, तर काहींनी आणखी काही वेळ प्रतीक्षा करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. वैभवला भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला आपल्या क्षेत्ररक्षणावर काम करावे लागले. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी या वैभवला भारतीय संघात घ्यावे की नाही, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

संगकारा म्हणतात की, एखादा खेळाडू खेळण्यापूर्वी तो तयार आहे की नाही हे कधीच कळत नाही. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत अव्वल स्थान काबीज केले आहे. त्याने १६ सामन्यांत ४८.५० च्या सरासरीने ७७६ धावा केल्या आहेत. त्याचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला नसला तरी तो अजूनही ऑरेंज कॅप जिंकू शकतो. त्याने याच आयपीएल हंगामात ख्रिस गेलचा हंगामातील सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. तसेच त्याने अनेक विक्रमे रचली आहेत.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात वैभवने ज्याप्रकारे फलंदाजी करत स्थिती सांभाळली, याने संगकारा प्रभावित झाले. ते सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, “माझ्या मते त्याने अप्रतिम फलंदाजी केली. एका बाजूला विकेट्स पडत असताना त्याने संयम राखत खेळी केली ती एक खूप कठीण फलंदाजीची कामगिरी होती. त्याने आम्हाला खरोखरच एक चांगली धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भुमिका बजावली.”

“हा १५ वर्षांचा मुलगा खूप समजूतदार आहे. तो खेळ चांगला ओळखतो. परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्याला कसलीही भीती वाटत नाही”, असेही संगकारा म्हणाले आहेत.

वैभव भारतीय संघात खेळण्यास किती तयार आहे, या प्रश्नाचे उत्तरही संगकारा यांनी दिले असून ते म्हणाले, “खेळण्यापूर्वी कोणी तयार आहे की नाही हे कधीच कळत नाही आणि वैभवने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध जे काही केले आहे ते पाहता, तुम्ही त्याच्यासमोर उभी कराल अशा कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे; आणि मला खात्री आहे की, त्याला कॉल-अप अगदीच लवकर येईल.”

आयपीएल २०२६ चा क्वालिफायर २ सामना शुक्रवारी (२९ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. यामध्ये आरआरने वैभवच्या ९६ धावांच्या जोरावर २० षटकांत ६ विकेट्स गमावत २१४ धावसंख्या उभारली होती. लक्ष्याचा पाठलाग करताना जीटीकडून कर्णधार शुबमन गिलने शतकी खेळी केली आणि सामना ७ विकेट्सने जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---