आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाने उत्तम कामगिरी बजावली आहे. गट २ मध्ये न्यूझीलंड संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. विश्वचषक स्पर्धेच्या ३२ व्या सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा १६ धावांनी पराभव करत दोन महत्त्वाचे गुण मिळवले होते. न्यूझीलंड संघाच्या या विजयात लेगस्पिनर ईश सोढीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. अर्थात तो थोडा महागडा ठरला पण त्याने सामन्यात स्कॉटलंडच्या दोन महत्त्वाच्या विकेट्सही घेतल्या होत्या. सध्या ईश सोढी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.
पंजाबच्या लुधियाना येथे जन्मलेला, पण न्यूझीलंडमध्ये लहानाचा मोठा झालेल्या ईश सोढीने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेवर वर्चस्व गाजवले आहे, मात्र यादरम्यान तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी कारण त्याची गोलंदाजी नसून त्याची ‘समालोचन’ करण्याची शैली आहे. आयसीसीने सोढीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये नाही तर पंजाबीमध्ये समालोचक करत असल्याचे दिसून येते.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोढी पंजाबीमध्ये म्हणतो की, ‘सत श्री अकाल जी, माझे नाव इंदरबीर सिंग सोढी आहे. मला वाटतं आजकाल पंजाबीतही कॉमेंट्री व्हायला हवी. तर मी सुरुवात करणार आहे, माझ्यासोबत या. गोलंदाज समोरून येत आहे, चेंडू आत येत आहे आणि हा शॉट लागला आहे, अरे बॅटची कड लागली आहे. लाथ मारली, क्रिस्टियानो रोनाल्डो.’ त्याचा हा गंमतीदार व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर एका पत्रकाराने सोढीला हिंदीमध्ये उत्तर देण्याची विनंती केली होती. यावेळी गमतीने उत्तर देत सोढीने म्हटले होते की त्याची हिंदी इतकी चांगली नाही आणि जर त्याच्या आईने पाहिले आणि तिला काही चूक आढळली तर तो मार खाईल. तसेच त्याने सांगितले होते की, तो पुढच्यावेळी हिंदीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न करेल.
Ish Sodhi asked to answer a question in Hindi ????@ish_sodhi #IshSodhi #INDvsNZ #T20WorldCup21 pic.twitter.com/OVIksrplv5
— StumpMic Cricket (@stumpmic_) October 31, 2021
सोढी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याने भारताविरुद्धही शानदार गोलंदाजी केली होती. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता. टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाने आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि त्यांचा संघ आता उपांत्य फेरीच्या दिशेने जोरदार वाटचाल करत आहेत. गट २ मध्ये न्यूझीलंड संघ तिसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान संघ पहिल्या स्थानी आहे तर भारतीय संघ चौथ्या स्थानी. अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –






