---Advertisement---

न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने सांगितला दुसऱ्या टी२०मध्ये टीम इंडियाला रोखण्याचा प्लॅन

On: रविवार, जानेवारी 26, 2020 2:03 PM
---Advertisement---

आज (26 जानेवारी) ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs NewZealand) संघात 5 टी20 मालिकेतील दुसरा सामना (2nd Match in 5 Matches of T20 Series) पार पडत आहे. यापूर्वी झालेला पहिल्या टी20 सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. तसेच मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे.

यावेळी मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोढीने (Ish Sodhi) भारताच्या खेळाडूंची प्रशंसा केली आहे. भारताकडे 5-6 सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याचे त्याने सांगितले.

या 5 सामन्यांच्या मालिकेत पुनरागमनासाठी दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध न्यूझीलंडला गोलंदाजीमध्ये आणखी आक्रमक व्हावे लागेल, असे सोढी म्हणाला.

भारतावर दबाव बनवणे कठीण आहे. कारण भारतीय संघात जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. परंतु न्यूझीलंडला दुसऱ्या टी20 सामन्यात पुनरागमन करायचे असेल तर मार्ग शोधावा लागेल.

यावेळी सोढी भारताच्या फलंदाजीबद्दल सांगताना म्हणाला की, “भारतीय संघात 5-6 जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. तसेच ते जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असतात तेव्हा त्यांना रोखणे नेहमी कठीण असते. त्यामुळे ईडन पार्कचा आकार पाहता हे एक आव्हान असेल.”

“तुम्हाला कर्णधारासोबत चर्चा करावी लागते. मिशेल सँटनर (Mitchell Santner) आणि मी असे करत असतो. काल आम्ही मैदानाबाहेर होतो. यावेळी आम्ही केन विलियम्सनबरोबर याबद्दल खूप सारी चर्चा केली. मी 2-3 षटके स्पेल टाकले. यामध्ये एक डिफेंडिंग स्पेल होता तर दुसरा आक्रमक. त्यामुळे आम्हाला त्याचप्रकारे गोलंदाजी करता आली पाहिजे,” असे सोढी यावेळी म्हणाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---