भारतीय संघाचा युवा सलामीवीर ईशान किशन याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईशानला कसोटी पदार्पणाची संधी मिळेल, अशी शक्यता होती. पण प्रत्येक्षात मात्र त्याला कसोटी संघात संधी मिळाली नाही. उभय संघांतील वसोटी मालिकेत मात्र पहिल्याच सामन्यात ईशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले. पण यावेळी पुन्हा एखदा मोठी खेळी त्याला करता आली नाही.
ईशान किशन (Ishan Kishan) डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केले. भारतीय संघ त्यावेळी वनडे आणि कसोटी मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर होता. वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी खेळला गेला. ईशान किशनने या सामन्यात 131 चेंडूत 210 धावा कुटल्या होत्या. या सामन्यात ईशान किशनचा फॉर्म पाहून आगामी वनडे विश्वचषकात तो बारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार, असे बोलले जात होते. पण मागच्या काही महिन्यांमध्ये ईशानची बॅट खूपच शांत राहिली आहे.
बांगलादेशविरुद्ध ईशानने कारकिर्दीत पहिले द्विशतक केले. पण या द्विशतकानंतर त्याने मागच्या 10 डावांमध्ये एकही मोठी खेळी केली नाही. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये मागच्या 10 डावात ईशानने 37 धावांची सर्वोत्तम खेळी केली. यादरम्यान, त्याने 3, 1, 19, 4, 17, 8*, 5, 1, 2 आणि 37 धावांचे प्रदर्शन केले. ही आकडेवारी पाहता ईशान चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही, असेच दिसते. शुक्रवारी (17 मार्च) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ईशान अवघ्या 3 धावा करून पायचीत झाला.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियन संघ 35.4 षटकांमध्ये 188 धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. भारतासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा नियमित सलामीवीर डेविड वॉर्नर या सामन्यात खेळत नसल्याने मिचेल मार्शला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. मार्शने या संधीचे सोने करत 81 धावांची ताबडतोड खेळी केली. प्रत्युत्तरात बारताने अवघ्या 16 धावांवर तीन महत्वापूर्ण विकेट्स गमावल्या. (Ishan Kishan across formats since scoring the double century in december )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या आणि वनडे समीकरण जुळेना! ‘गोल्डन डक’ होत पदरी पडले आणखी एक अपयश
गिलक्रिस्ट नाही, हाच भारतीय जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, खुद्द ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा खुलासा