---Advertisement---

नाच मेरी जान, होके मगन तू! शार्दुल-इशानचा जबरदस्त ‘कपल डान्स’, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट

On: रविवार, ऑक्टोबर 31, 2021 3:03 PM
---Advertisement---

रविवारी (३१ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत ‘करो या मरो’ सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. स्पर्धेतील उपांत्यफेरी गाठण्यासाठी हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय खेळाडूंवर अतिरिक्त दबाव असणार आहे. हा दबाव कमी करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी मिळालेल्या रिकाम्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत डान्स देखील केला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आर अश्विनची पत्नी प्रीती नारायणने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शार्दुल ठाकूर आणि ईशान किशन हे दोघेही ‘कपल डान्स’ करताना दिसून येत आहेत. तर कर्णधार विराट कोहली आपल्या मोबाईलमधून गाणं वाजवताना दिसून येत आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा हा उत्साह साजरा करत असतानाचा व्हिडिओ पाहून चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे.

प्रीती नारायणने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहली, अनुष्का शर्मासह वामिकाचा देखील फोटो शेअर केला आहे. या पोस्टवर कॅप्शन देत, ‘तुम्हा सर्वांना आमच्याकडून हॅप्पी हॅलोविन’ असे लिहिले आहे.

न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंचा हा मस्ती करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हॅलोविन मोठ्या उत्साहात साजरा केल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CVqKBiMP8YT/?utm_medium=copy_link

नाणेफेक ठरेल टर्निंग पॉइंट
भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये संध्याकाळी सामना रंगणार आहे. ज्यामुळे नाणेफेक अतिशय महत्वाचे ठरणार आहे. कारण पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांना तंबूत धाडले होते. अशातच न्यूझीलंड संघाकडे देखील मजबूत गोलंदाजी आक्रमण आहे, जे भारतीय संघावर हल्लाबोल करू शकतात. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी हार्दिक फिट; शार्दुलविषयी कॅप्टन विराट म्हणाला, ‘तो आमच्या योजनेचा भाग…’

विजयाच्या हॅट्रिकनंतर इंग्लंडचं सेमीफायनलचं तिकीट पक्क, तर ऑस्ट्रेलिया एका स्थानाने घसरला; पाहा गुणतालिका

बटलर-बेअरस्टो जोडीने षटकारांची वर्षा करत झम्पाची उडवली दाणादाण, बघून मॉर्गनलाही आली दया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---