रिषभ पंत याचा शुक्रवारी (30 डिसेंंबर) झालेला अपघात क्रिकेटविश्वासाठी मोठा धक्का होता. श्रीलंकेविरुद्ध जानेवारी महिन्यात मायदेशात खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेत पंत खेळणार नव्हता. पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. आता दुखापतीनंतर तो फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. अशात या कसोटी मालिकेत पंतच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यासाठी तीन प्रमुख खेळाडू चर्चेत आहेत.
शुक्रवारी पाहाटे रिषभ पंत (Rishabh Pant) दिल्लीहून रुरकीला निघाला होता. घरच्यांसोबत नवीन वर्षाची सुरूवात करण्यासाठी पंत घरी निघाला होता आणि आईला सरप्राईज देण्याच्या विचारात होता. पण वाटेत त्याचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर पंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने गाडीने पेट घेण्यापूर्वी पंत गाडीतून बाहेर पडला होता. अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली असून पुढचा मोठा काळ तो क्रिकेट खेळू शकणार नाहीये. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी- मार्च महिन्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणजेच चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेत पंत खेळणार नसल्यामुळे श्रीकर भरत (Srikar Bharat), उपेंद्र यादव (Upendra Yadav) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या तिघातील कोणता खेलाडू संघात जागा मिळवतो हे पाहण्यासारखे असेल. पंत या मालिकेपूर्वी दुखापतीतून सावरण्याची कुठलीच शक्यता सध्यातरी दिसत नाहीये. ईशानने भारतासाठी वनडे आणि टी-20 सामने खेळले आहेत. पण कसोटी फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप संधी मिळाली नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपुरमध्ये सुरू होईल. या सामन्यात पंतची कमी भरून काढण्यासाठी निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापन कोणत्या खेळाडूंला संधी देतात, हे पाहण्यासारखे असेल.
अपघातग्रस्त पंतला पाठ, गुडघे आणि घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटले असून यातूल सावरण्यासाठी त्याला 4 ते 6 महिने वेळ लागणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार आगमी वर्षीच्या आयपीएल हंगामाला देखील पंत मुकू शकतो. (ishan kishan and two others are in race to replace Rishabh Pantin test series against australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी कुटुंबाने नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गाठली दुबई, मुलीसोबतचा व्हिडिओ आला समोर
हा तर लईच ओव्हर कॉन्फिडेंस! ऑस्ट्रेलियाचे हेड कोच म्हणतायेत, ‘ भारतात खेळायचे तर अभ्यास…’