भारतीय संघ सध्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. कसोटी संघात स्थान न मिळाल्याने आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्यामुळे भारताचा विकेटकीपर-फलंदाज इशान किशन याच्याकडे मोकळा वेळ आहे. या वेळेचा त्याने चांगलाच उपयोग केला आहे. सोशल मीडियावर त्याचे ऑफिसमधील अवताराचे फोटो व्हायरल झाले आहे. त्याविषयी अधिक जाणून घेऊ.
इशानने पाटणा येथील RBIच्या (भारतीय रिझर्व्ह बॅंक) ऑफिसला भेट दिली. तिथे तो कर्मचारी असून सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) म्हणून कार्यरत आहे. तो ‘अ’ श्रेणीचा कर्मचारी असून त्याला ही नोकरी क्रीडा कोट्याअंतर्गत मिळाली आहे. त्याच्या ऑफिसमधील आगमनानंतर त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी एकच झुंबड उडाली.
मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा इशान आता बॅंकेच्या अधिकृत जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे. त्याने ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत फोटो काढले, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेत इशान किती पगार कमावतो. या प्रश्नाचे उत्तर, तो महिन्याचे जवळपास 1 ते 1.4 लाख कमावू शकतो. त्याचे RBIशी नाते खूपच जुने आहे. जेव्हा 2024 मध्ये त्याने आंतररराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता, तेव्हा तो नवी मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवरील एका टी 20 स्पर्धेत RBIकडून खेळला होता.
इशान आता 23 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. तेथे तो पूर्व विभागाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. त्या संघाचा उपकर्णधार वैभव सूर्यवंशी आहे.
दुलीप ट्रॉफी 2026 साठी पूर्व विभागाचा संघ – इशान किशन (कर्णधार) (झारखंड), वैभव सूर्यवंशी (उपकर्णधार) (बिहार),अभिमन्यू इसवरन (बंगाल), सुदीप कुमार घरामी (बंगाल), मोहम्मद शमी (बंगाल), मुकेश कुमार (बंगाल), शाहबाज अहमद (बंगाल), सूरज जैस्वाल (बंगाल), विराट सिंग (झारखंड), कुमार कुशाग्रा (झारखंड), शिखर मोहन (झारखंड), सुब्रांशू सेनापती (ओडिसा), अभिजित सरकार (त्रिपुरा), अनुकुल रॉय (झारखंड) आणि डेनिस दास (आसाम)






