आयपीएलनंतर मोठ्या काळानंतर भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी (९ जून) निळ्या जर्सीमध्ये पाहायला मिळाले. आयपीएल २०२२ मध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना निवडकर्त्यांनी या टी-२० मालिकेसाठी निवडले आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला गेला. भारताचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने या सामन्यात विक्रमी धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकी संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) मोठी खेळी करू शकला. त्याने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी-२० मध्ये एखाद्या भारतीय फलंदाजाने केलेली ही चौथी सर्वात मोठी खेळी ठरली.
टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध यापूर्वी सर्वात मोठी खेळी करणाऱ्यां भारतीयांमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका टी-२० सामन्यात १०६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे, ज्याने आफ्रिकी संघासोबत टी-२० मध्ये १०१ धावांची खेळी केली होती. तिसऱ्या क्रमांकावर आहे मनीष पांडे, ज्याने या संघासोबत खेळलेल्या टी-२० सामन्यात नाबाद ७९ धावा ठोकल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर इशान किशन आहे, ज्याने गुरुवारी आफ्रिकी संघाविरुद्ध ७६ धावा केल्या. दिग्गज विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने नाबाद ७२ धावा ठोकल्या होत्या.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय खेळाडू
१०६ – रोहित शर्मा
१०१ – सुरेश रैना
७९ – मनीष पांडे*
७६ – इशान किशन
७२ – विराट कोहली*
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आणि संघाला २११ धावांपर्यंत पोहोचवले. या धावा करण्यासाठी भारताच्या ४ फलंदाजांना विकेट्स गमवाव्या लागल्या. इशान किशननंतर श्रेयस अय्यरने सर्वाधिक ३६ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा एक विजय टीम इंडियाला पडला महागात! धुळीस मिळालं इतिहास रचण्याचं स्वप्न
मिलर- रस्सीपुढे भारतीय गोलंदाजांची दैना, दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने काबीज केला पहिला सामना
‘या’ विक्रमात भारताचा हात कुणीच पकडू शकत नाही, इंग्लंड अन् ऑस्ट्रेलिया तर लईच लांब