---Advertisement---

बांगलादेशमध्ये द्विशतक झळकावताच केला विश्वविक्रम, ‘ही’ गोष्ट करणारा जगातला पहिला फलंदाज बनला ईशान किशन

Ishan kishan Double hundred
---Advertisement---

सध्या भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना चट्टोग्राम येेथे खेळवला गेला. या सामन्यात दुखापतग्रस्त राहित शर्मा याच्या जागी ईशान किशान याचा समावेश केेला होता. भारताने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत 409 धावा केल्या. या सामन्यात ईशान किशन याने झंझावती द्विशतक झळकावले. त्याचबरोबर त्याने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. किशन आपल्या पहिल्या शतकाचे रुपांतर द्विशतकात करणारा पहिला खेळाडू बनला आहे.

बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. त्याच्या ऐवजी ईशान किशन (Ishan Kishan) याला संघात स्थान देण्यात आले. त्याने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक या सामन्यात झळकावले. शतक पूर्ण केल्यानंतर तो एवढ्यावरच थांबल नाही, त्यानंतर त्याने आपली धावगती वाढवली आणि द्विशतकही झळकावले. आपल्या कारकीर्दीतील पहिले शतक लगावल्यानंतर त्याचे रुपांतर द्विशतकात करणारा किशन जगतील पहिला फलंदाज ठरला.

भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतील तिसरा सामना चट्टोग्राम येथे खेळवला गेला. या सामन्यात भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पहिला गडी लवकर गमावल्यानंतर ईशान किशन आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी भारताचा डाव सांभाळला आणि 409 धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. ईशानने 131 चेंडूत 210 धावा केल्या. त्याच्या या डावात त्याने 24 चौकार आणि 10 षटकार लगावले. विराटने देखील त्याला सुरेख साथ दिली. त्याने 91 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनेे 113 धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इशान किशन तर निघाला विराटपेक्षा फास्ट! बनला ‘या’ यादीत सहभागी होणारा चौथा भारतीय
चट्टोग्राममध्ये ईशानचे ‘विराट’ वादळ! बांगलादेशसमोर विजयासाठी‌ 410 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---