इशान किशन पुनरागमनासाठी सज्ज, 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘या’ प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना दिसणार

Ishan Kishan To Play Domestic Cricket :- रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. परंतु भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज व सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) भारतीय संघातून बाहेर आहे. यादरम्यान आता इशान किशन लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे.
गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून अचानक माघार घेतल्यानंतर तो भारतीय संघाबाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) केंद्रीय करारही गमावला आहे. निवडकर्त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, उपलब्ध सर्व खेळाडूंना आपापल्या राज्यांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. तसे न केल्यास त्याचा भारतीय संघासाठी विचार केला जाणार नाही. याच पार्श्वभूमीवर आता इशान किशन देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 15 ऑगस्टपासून चेन्नई येथे होणाऱ्या बुची बाबू स्पर्धेत हा यष्टिरक्षक फलंदाज झारखंडकडून खेळणार आहे.
‘न्यूज 18’ नुसार एका सूत्राने सांगितले की, “होय, ईशान किशन बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून खेळणार आहे. ही एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे, जिथे सर्व शीर्ष लाल-बॉल संघ खेळतात. परिस्थिती आव्हानात्मक आहे. पण पुढच्या दीर्घ देशांतर्गत हंगामासाठी स्वतःला तयार करण्याचा हा योग्य मार्ग आहे.”
झारखंड क्रिकेट असोसिएशनने (JSCA) अजूनही किशनच्या या मोसमातील योजनांबाबत मौन बाळगले आहे, परंतु त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या उपलब्धतेची आणि सहभागाची पुष्टी केली आहे. याआधी बातमी आली होती की, झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनने प्री-सीझनच्या 25 संभाव्य खेळाडूंच्या यादीत इशानचा समावेश केला आहे. काही हितचिंतक आणि राष्ट्रीय निवडकर्त्यांचा सल्ला घेतल्यानंतर किशनने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेतील पराभवासाठी कोलंबोची खेळपट्टी जबाबदार; सहाय्यक प्रशिक्षक नायरने सांगितलं कारण
IND vs SL भारताविरुद्ध कहर केलेल्या फिरकी गोलंदाजानं केला मोठा खुलासा, म्हणाला…
3 भारतीय खेळाडू, ज्यांना श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात यावं