भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारली. मात्र, सलामीवीर ईशान किशन हा या सामन्यातही मोठी कामगिरी करू शकला नाही. टी20 क्रिकेटमध्ये त्याची अपयशाची मालिका सुरूच राहिली आहे.
हा मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना असल्याने यामध्ये भारतीय फलंदाजांवर सर्वांचे लक्ष होते. मात्र, पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतरही संधी मिळालेल्या ईशान किशन याला पुन्हा अपयश आले. दुसऱ्याच षटकात मायकेल ब्रेसवेल याने त्याला पायचित केले. या मालिकेत तो अनुक्रमे 3, 19 व 1 अशा धावा करू शकला.
इशान मागील महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात द्विशतक करून चर्चेत आलेला. त्यामुळे वनडे संघातील त्याची जागा निश्चित मानली जाते. परंतु, टी20 क्रिकेटमध्ये मागील 14 सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. तो या मागील 14 सामन्यात केवळ 200 धावा काढू शकला आहे. यादरम्यान त्याने केवळ दोन वेळा 30 चा आकडा पार केला असून, 37 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
ईशानचा हा खरा फॉर्म असाच सुरू राहिल्यास त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. कारण, संघाचा प्रमुख सलामीवीर म्हणून कर्णधार रोहित शर्मा याची जागा पक्की मानली जाते. तर, याच सामन्यात शुबमन गिलने शतक ठोकत आपली दावेदारी सिद्ध केली आहे. याव्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड व पृथ्वी शॉ हे दोन्ही सलामीवीर बाकावर बसून आहेत.
(Ishan Kishan Flop Again In T20I For India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूची मोठी घोषणा, कसोटी क्रिकेटमधून घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक
अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मिळाले भरभरून! इतिहासात प्रथमच 3000 पेक्षा जास्त कोटींची तरतूद




