इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करन कसोटी टॉम करन याने कोसीट क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. टॉम करन याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खेळत राहणार असल्याचे सांगितले, पण कसोटी क्रिकेटमधून तो विश्रांती घेत आहे. कुरेन सध्या दुबईमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये खेळत आहे.
टॉम करन (Tom Curran) याने कसोटी क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचे कारण देखील यावेली सांगितले. शारीरिक आणि मानसिक कारणास्तव करन कसोटी क्रिकेटमध्ये पुढच्या अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठा तो पूर्णपणे तयार आहे, असे वाटल्यानंतरच आता करन या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करेल. करन काउंटी क्रिकेटमध्ये सरे संघासाठी खेळतो, पण आता तो काउंटी क्रिकेटमध्ये देखील खेळणार नाही. ही माहिती देताना टॉम करन म्हणाला, “सरे संघासाठी ही चांगली बातमी नाहीये. पण मी सरे संघाचे संचालक आणि चाहत्यांनी मला समजून घेतल्याबद्दल आभारी आहे. ही माजी होम टीम आहे. अशा आहे संघ माझा निर्णय समजून घेईल.”
टॉम करनच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत फक्त दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्याने डिसेंबर 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. तर 2018 साली ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच त्याने कारकिर्दीतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळला आहे. या दोन कसोटी सामन्यांमध्ये करनने एकूण 66 धावा केल्या आणि फक्त दोन विकेट्स घेऊ शकला. कसोटी फॉरमॅटव्यतिरिक्त विचार केला, तर करनने इंग्लंड संघासाठी 28 वनडे आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
दुबईमध्ये सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये डिजर्ट वायपर्स संघासाठी टॉम करन खेळत आहे. ही लीग संपल्यानंतर करन पाकिस्तान दौऱ्यावर जाईल. पाकिस्तान सुपर लीगमध्ये देखील टॉम करन खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणून ओळखले जाते. टॉम करण आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांसाठी खेळला आहे. (Tom Curran take indefinite break from test format)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजांना धडकी भरवणारा कीवी गोलंदाजही झाला पंड्याच्या कॅप्टन्सीचा फॅन; म्हणाला, ‘त्याने भारतासाठी…’
मूळचा पाकिस्तानी असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला नाही मिळाला भारताचा व्हिसा, मीस केली फ्लाईट