---Advertisement---

‘आऊट ऑफ फॉर्म’ इशानचे राजस्थानविरुद्ध ‘रॉयल’ कमबॅक, प्रेयसीचे टीकाकारांना तिखट प्रत्युत्तर

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 6:45 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेत मंगळवारी (०५ ऑक्टोबर) रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयात ईशान किशनने मोलाचे योगदान देत अर्धशतकी खेळी केली, ज्यामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. यानंतर त्याच्या प्रेयसीने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे.

मुंबई इंडियन्स संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन याने राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या ९१ धावांचा पाठलाग करताना, ईशान किशनने २५ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ५० धावांची तुफानी खेळी केली.

ही खेळी पाहून ईशान किशनची प्रेयसी अदिती हुंडीयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने ईशान किशनचा फोटो न शेअर करता, स्वतःचा सेल्फी शेअर केला आहे. या फोटोवर तिने कॅप्शन म्हणून, “देवाचा विलंब हा देवाचा नकार नसतो” असे लिहिले आहे. तसेच पुढे तिने निळ्या रंगाचा हार्ट देखील टाकला आहे.

या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. राजस्थान रॉयल्स संघाकडून एविन लुईसने सर्वाधिक २४ तर डेविड मिलरने १५ धावांची खेळी केली. तर मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना नथान कुल्टर नाईलने सर्वाधिक ४, जिम्मी निशमने ३ आणि जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले होते.

राजस्थान रॉयल्स संघाला २० षटक अखेर ९ बाद ९० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून ईशान किशनने सर्वाधिक ५० तर रोहित शर्माने २२ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने ८ गडी राखून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘खेळपट्टी किंवा नाणेफेकी नाही तर पराभवामध्ये दोष आमचाच’, संघ निर्देशकाची प्रामाणिक कबुली

चेहरा ओळखीचा दिसतोय ना? आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावणारी ‘तान्या पुरोहित’, अनुष्काशी आहे खास नाते

फिलिप्स ५० मीटरपर्यंत धावला, चेंडू बाउंड्रीला लागायच्या आत चौकार अडवला; फिल्डिंग बघून म्हणाल, अय्योव!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---