---Advertisement---

इशान किशनचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, शतक ठोकल्यानंतर शेअर केली दोन शब्दांची सूचक पोस्ट

---Advertisement---

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशननं दुलीप ट्रॉफीमध्ये शतक झळकावून दमदार पुनरागमन केलं. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत इंडिया सी कडून खेळताना त्यानं इंडिया बी विरुद्ध शानदार शतक झळकावलं. किशननं 111 धावांच्या खेळीत 126 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकारांसह 3 गगनचुंबी षटकार ठोकले. आपल्या शतकासह इशाननं त्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं, जे गेल्या काही काळापासून त्याच्यावर निशाणा साधत होते.

या खेळीनंतर त्यानं सोशल मीडियावर दोन शब्दांची एक पोस्ट शेअर केली, जी आता व्हायरल होत आहे. सामना संपल्यानंतर इशाननं इंस्टाग्रामवर दोन शब्दांची पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, “अपूर्ण कार्य”. इशानची ही पोस्ट व्हायरल होत असून, यावर त्याच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

 

या शतकासह इशान किशननं टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे ठोठावले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याला संघात स्थान मिळणं कठीण असलं तरी टी20 मालिकेत त्याला नक्कीच संधी मिळू शकते. बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत रिषभ पंतला विश्रांती मिळाल्याच किशनचं टीम इंडियात पुनरागमन होऊ शकतं.

इशान किशनला गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयचा वार्षिक करार गमवावा लागला होता. तो मानसिक थकव्याचं कारण सांगून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला. यानंतर बीसीसीआयच्या विनंतीनंतरही त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतला नाही आणि थेट आयपीएल खेळला. आता तो पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. इशाननं दुलीप ट्रॉफीपूर्वी खेळल्या गेलेल्या बुची बाबू स्पर्धेतली शतक ठोकलं होतं.

हेही वाचा – 

देशांतर्गत क्रिकेटमध्ये 19 शतकं, मात्र अजूनही टीम इंडियात स्थान नाही; या फलंदाजानं मधल्या फळीसाठी ठोकला दावा
टीम इंडियाने दुर्लक्ष केलेल्या रुतुराजची दुलीप ट्रॉफीत अप्रतिम कामगिरी, दोन्ही डावात झळकावलं अर्धशतक
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत ‘या’ स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती! इशानला होऊ शकतो फायदा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---