भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झाला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या या अपघातावर अनेकांनी आपली काळजी व्यक्त केली. अशातच ईशान किशन याला जेव्हा त्याच्या अपघाताबाबत कळाले तेव्हा तो निशब्द झाला. त्याच्या या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ईशान किशन (Ishan Kishan) सध्या झारखंडकडून रणजी ट्रॉफी खेळत आहे. एका सामन्यात तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला असता चाहत्यांनी त्याला सेल्फी आणि ऑटोग्राफची मागणी केली. तेव्हा त्याला एका चाहत्याने पंतच्या अपघाताविषयी सांगितले. त्यावर तो काहीवेळ गप्प राहिला. त्याला काय बोलावे की नाही हे सुचत नव्हते.
पंत त्याच्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात होता. तेव्हा तो एकटाच गाडी चालवत होता. खड्डा चुकवण्याच्या नादात त्याची गाडी डिवायडरला धकडून पलिकडे गेली आणि गाडीने पेट घेतला. त्याने खिडकीची काच तोडत बाहेर पडला.यामध्ये त्याच्या डोके, पाय आणि पाठ याला मोठी जखम झाली आहे. तसेच त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली असून तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
यामुळे ऑस्ट्रेलिया आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023च्या हंगामातून बाहेर होऊ शकतो. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. या मालिकेचे सर्व सामने आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या स्पर्धेचा भाग आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका जिंकणे भारतासाठी महत्वाचे आहे.
https://twitter.com/twstopsfreespch/status/1608694465878953984?s=20&t=kvAYMVLvXYbm6331Jh_sSQ
पंत हा भारताच्या कसोटी संघाचा महत्वाचा खेळाडू असून त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याने मागील काही सामन्यांमध्ये महत्वाची सामनाविजयी खेळी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर आयपीएल खेळले जाणार आहे.
(Ishan Kishan is speechless after hearing the news of Rishabh Pant’s accident video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे प्रेमाच्या पिचवरही ‘लांबा’ आघाडीवरच राहिले! वाचा बेधडक ‘रॅम्बो’ची जीवनकहाणी
VIDEO: आऊट ऑर सिक्स? ऑस्ट्रेलियन खेळाडूने सीमारेषेवर पकडला आश्चर्यकारक झेल