पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात भारतीय संघाची वरची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. मात्र, मध्यक्रमात ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांची भागीदारी महत्वापूर्ण ठरली. ईशान किशन याने 81 चेंडूत 82 धावांची खेली केली. विशेष म्हणजे ईशानच्या वनडे कारकिर्दीतील हा पाकिस्तानविरुद्धचा पहिलाच सामना होता. शनिवारी (2 सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या. सोबतच ईशानच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला.
पाकिस्तानविरुद्ध वनडे कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने शनिवारी कँडीमध्ये अप्रतिम खेळी केली. पाकिस्तानविरुद्ध आपल्या पहिल्या वनडे सामन्यात सर्वोत्तम प्रदर्शन आजही भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) याच्या नावावर आहे. अजहरुद्दीनने 1985 साली पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला होता, ज्यामध्ये नाबाद 93 धावा कुटल्या होत्या.
उभय संघांतील या सामन्यात भारताची धावसंख्या 4 बाद 66 असताना ईशान किशन खेळपट्टीवर आला. त्याने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सोबत 138 धावांची भागीदारी केली. पण वैयक्तिक शतक करण्यापासून अवघ्या 18 धावा दूर असताना त्याने बाबर आझमच्या हातात विकेट गमावली. भारताच्या डावातील 38 वे षटक टाकण्यासाठी हॅरिस रौफ आला होता. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर ईशानने विकेट गमावली. (Ishan Kishan is the second highest run-scorer in his first ODI against Pakistan)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
INDvPAK: ईशान-हार्दिकच्या संघर्षाने टीम इंडियाच्या 266 धावा, पाकिस्तानची वेगवान तिकडी चमकली
फॉर्म खरंच गेलाय! मागील 18 वनडेत गिलची बॅट थंडावलेलीच, धक्कादायक आकडेवारी समोर