Ishan Kishan : भारताचा स्फोटक फलंदाज इशान किशन गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संघ त्यांच्यावर खूप विश्वास ठेवत होता आणि त्याला बराच काळ आपल्यासोबत ठेवले देखील होते. तसेच आयसीसी वर्ल्ड 2023 सारख्या मोठ्या टूर्नामेंटमध्येही तो खेळला होता. मात्र त्याच्या एका निर्णयाने त्याचे करिअर पणाला लावले आहे. कारण, बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना एक मेसेज पाठवण्याच्या तयारीत आहे. जे आता सध्या भारतीय संघाचा भाग नाहीत किंवा रणजी ट्रॉफीसारख्या महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत नाहीत.
यामध्ये यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचे नाव सध्या आघाडीवर आहे. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात इशानने अचानक ब्रेक मागितला होता. त्यानंतर तो सातत्याने क्रिकेटपासून दूर गेला आहे. तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले आहेत की, किशनला संघात परतायचे असेल तर त्याला रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळावे लागणार आहे.
याबरोबरच, संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला एवढी मेहनत करावी लागेल याची कल्पनाही त्याने केली नसेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली, मात्र या मालिकेत इशानला संधी मिळाली नव्हती.
अशातच इशानने अजुन पण एकही रणजी सामना खेळलेला नाही. तर काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, इशान किशनने पांड्या ब्रदर्ससोबत सराव सुरू केला आहे. म्हणजे तो रणजी ट्रॉफीसाठी नाही तर आयपीएलसाठी तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण अशा परिस्थितीत रणजी ट्रॉफीदरम्यान खेळाडू आयपीएल मोडमध्ये आल्याने बीसीसीआय आता प्रचंड वैतागले आहे.
तसेच, बीसीसीआयच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “पुढील काही दिवसांत सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्य संघाकडून खेळण्यासाठी बीसीसीआयकडून कळवले जाईल, आणि NCA मध्ये बरे होत आहेत त्यांना सूट देण्यात येणार आहे.”
दरम्यान, इशान किशन जर जास्तकाळ भारतीय संघापासून दूर राहिला तर त्याचा परिणाम हे त्याच्या केंद्रीय करारावर होणार आहे. इशान किशन सध्या ग्रेड C करारात मोडतो. त्याला वर्षाला 1 कोटी रूपये मिळतात. तर तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसल्याने बीसीसीआय त्याच्या कराराबाबत विचार करण्याची देखील शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर आकाश दीपची पहिला प्रतिक्रिया समोर; म्हणाला…
- सासऱ्यांविषयी प्रश्न विचारल्यावर रागाने लाल झाली रिवाबा! पाहा भाजप आमदार नक्की काय म्हणाल्या