भारतीय संघ व्यवस्थापन संध्या आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघ तयार करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान संघातील खेळाडूचा स्वतःच्या फिटनेसविषयी हलगर्जीपणा पाहायला मिळाला. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, इशानला गंभीर दुखापत होऊ शकत होती, पण सुदैवाने तो बचावला.
व्हायरल व्हिडिओ एजबस्टन टी-२० सामन्यातील असल्याचे दिसते. सामना सुरू होण्यापूर्वी इशान किशन (Ishan Kishan) सहकारी खेळाडूंसोबत मस्ती करताना पाहिला गेला. व्हिडिओत दिसत आहे की, इशान सहकारी खेळाडूच्या डोक्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करतो. इशान या प्रयत्नात यशस्वी देखील होतो, पण उडी मारल्यानंतर त्याचे स्वतःवर संतुलन राहत नाही. त्यानंतर तो सलग तोंडावर पडल्याचे दिसत आहे. तो अशा पद्धतीने पडल्यानंतर बाकीचे खेळाडू हसत-हसत लोटपोट होतात. तर दुसरीकडे इशान मात्र वेदनेत दिसत आहे.
इशानचे मैदानात ही उडी मजेमध्ये मारली असली, तरी त्याला हे कृत्य खूप महागात पडू शकत होते. कारण यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुलनंतर इशानला संघाचा तिसरा सलामीवीर फलंदाज मानले जात आहे. वेळप्रसंगी त्याला डावाची सुरुवात करावी लागू शकते. परंतु त्यालाच जर गंभीर दुखापत झाली, तर संघाची आणि पर्यायाने त्याचीही अडचण वाढू शकते.
https://twitter.com/PriCaasm/status/1547430367178543104?s=20&t=vpreg3-WX_0tmRY4BJcecw
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने गुरुवारी (१४ जुलै) भारतीय संघाची घोषणा केली. इशान किशला या संघातही संधी मिळाली आहे आणि दौऱ्यात त्याची भूमिका महत्वाची असेल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, आर अश्विन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, कुलदीप यादव (फिटनेसवर अवलंबून),केएल राहुल (फिटनेसवर आधारीत).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा –
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या फॉर्मबाबत दादांनी केले मोठे वक्तव्य; संघातून वगळले गेल्याचे कारणही केले स्पष्ट
WIvsIND | बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर वेगवान गोलंदाजीचा लिडर, अर्शदीप-आवेशही डागणार तोफा