आगामी टी२० विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. मागील विश्वचषकातील अपयश विसरून रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ या विश्वचषकात उतरेल. या विश्वचषकासाठी भारतीय संघ कसा असेल याविषयी अनेक चर्चा होत आहेत. संघात कोणाला जागा मिळावी, याबाबत अनेक चर्चा होताना दिसतायेत. त्याचवेळी असल्याचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने देखील भारतीय संघाविषयी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाला पॉंटिंग?
आगामी टी२० विश्वचषकात भारतीय संघाच्या आव्हानाविषयी ऑस्ट्रेलियाचा विश्वविजयी कर्णधार रिकी पाँटिंगने चर्चा केली. भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून कोणाला पसंती देणार? याबाबत बोलताना तो म्हणाला,
“मला विचारलं तर यष्टीरक्षक म्हणून माझी पसंती रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांना असेल. माझ्या संघात ईशान किशन नसेल. पंतने वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये काय केले आहे हे आपण पाहतोय. अगदी तशीच कामगिरी तो टी२० मध्येही करू शकतो. दिनेश कार्तिक याचाही मागील आयपीएल हंगाम सर्वोत्तम गेला आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना मी माझ्या संघात ठेवण्याचा प्रयत्न करेन.” पॉंटिंग हा आयपीएलमध्ये रिषभ पंत नेतृत्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
पॉंटिंगने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनविषयी बोलताना म्हटले,
“भारतीय संघाचे टॉप थ्री रोहित राहुल व विराट हेच असतील. त्यानंतर पंत, हार्दिक व कार्तिक यांचा क्रमांक लागेल. त्यामुळे सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना बाहेर बसावे लागू शकते. गोलंदाजीत भारत एक मजबूत कॉम्बिनेशन घेऊन उतरेल.”
त्याचवेळी, सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली याला आणखी संधी द्यायला हवी, जेणेकरून तो आणखी आत्मविश्वास आल्यानंतर भारतीय संघासाठी चांगले योगदान देऊ शकतो, असे पॉंटिंगने शेवटी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
इतर देशातील टी२० लीगमध्ये खेळणार भारतीय क्रिकेटपटू?
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती
भारताच्या ‘या’ खेळाडूवर वेस्ट इंडीज दौऱ्यात असेल सर्वांचे लक्ष, प्रज्ञान ओझावरही पाडलाय प्रभाव