सोमवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनला आशिया चषकासाठी संघात स्थान मिळालेले नाही. संघातून वगळल्यानंतर ईशान किशनने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपली व्यथा मांडली. त्याला गायब व्हायचे नाही, असे इशान किशनने एका गाण्याच्या माध्यमातून सांगितले.
ईशान किशन गेल्या एक वर्षापासून टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग होता. बॅकअप ओपनर आणि बॅकअप यष्टिरक्षक म्हणून ईशान किशनचा वापर केला जात होता. पण केएल राहुल आशिया कपसाठी टीम इंडियात परतला आहे. त्याचवेळी, यंदाच्या आयपीएलनंतर दिनेश कार्तिकने बॅकअप यष्टिरक्षक पदावर दावा केला आहे.
इंस्टाग्रामवर एक गाणे शेअर करत ईशान किशनने लिहिले की, ”अब ऐसा बनना नहीं भले घायल हो जाना, तुझे मूर्ख समझे कोई, तो तू फायर हो जाना, इन सब आगे वालों की तरह ना गयाब हो जाना.” असं हिंदी कॅप्शन देत ईशानने एक स्टोरी शेअर केली आहे.
किशनला विश्वचषक संघात स्थान मिळणे कठीण आहे
मात्र, यंदाच्या आयपीएलमधूनच ईशान किशनचा आलेख घसरायला लागला. ईशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींची मोठी रक्कम देऊन खरेदी केले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये इशान किशनने चांगली कामगिरी केली. पण बहुतेक मोसमात त्याच्या बॅटने निराशा केली. किशनला १४ सामन्यात केवळ ४२८ धावा करता आल्या.
असे असूनही ईशान किशन टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा एक भाग राहिला. यावर्षी इशान किशनला भारताकडून ९ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. या ९ सामन्यात किशनने २५४ धावा केल्या. आता आशिया चषकातून बाहेर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी इशान किशनची निवड करणेही कठीण जात आहे. गेल्या वर्षी ईशान किशनला टी-२० विश्वचषकासाठी बॅकअप सलामीवीर आणि बॅकअप यष्टिरक्षक म्हणून जागा मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 | ‘बुमराहाची कमी संघाला जाणवेल, पण…’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया
‘भारताने आशिया चषकासाठी निवडलेला संघ चुकीचा!’ युएईची खेळपट्टीच सांगते टीम इंडिया जिंकू शकत नाही
‘धोनीला जितके महान समजले जाते तितका तो नाही!’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने केलेल्या विधानावरून खळबळ