भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा वनडे सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाच्या सलामीवीरांनी जबरदस्त सुरुवात करून दिली होती. रोहित शर्मा आणि शुबमन गिल याने 200 हून अधिक धावांचे योगदान दिले होते. मात्र, त्यांच्या विकेटनंतर भारताच्या पुढील विकेट्स नियमित अंतराने पडत गेल्या. मात्र, यादरम्यान एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले, ते म्हणजे ईशान किशन याची विकेट. विराट कोहली आणि ईशानमध्ये झालेल्या गोंधळामुळे त्याला त्याची विकेट गमवावी लागली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
शुबमन गिल (Shubman Gill) याची 28व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विकेट पडली. यावेळी भारताची धावसंख्या 230 इतकी होती. यानंतर ईशान किशन (Ishan Kishan) खेळपट्टीवर आला. तो यावेळी फॉर्ममध्ये दिसत होता, परंतु त्याला जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही.
झालं असं की, सामन्याच्या 35व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर किशन याने एक शॉट मारला. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) याला धाव घेण्याचा इशारा केला. मात्र, यावेळी तो जसा समोरच्या दिशेने धावला, तेव्हा त्याने पाहिले की, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. त्यानंतर तो परत माघारी वळला. मात्र, तोपर्यंत विराट त्याच्याजवळ आला होता. यावेळी दोघेही भारतीय खेळाडू एकाच दिशेला धावताना दिसले. या गोंधळामुळे शेवटी किशनला त्याची विकेट गमवावी लागली.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे विराटही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. त्याने ईशानपाठोपाठ 284 धावांवर विकेट गमावली. यावेळी विराट 36 धावांवर खेळत होता. भारताकडून यावेळी शुबमन गिल याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने 112 धावा चोपल्या. या धावा त्याने 78 चेंडूत 5 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा (101) आणि हार्दिक पंड्या (54) यांनीही मोलाचे योगदान दिले. तसेच, शार्दुल ठाकूरनेही 25 धावा केल्या.
या खेळाडूंच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 385 धावा केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचा डोंगर पार करावा लागेल. कारण, पहिले दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. (ishan kishan run out after confusion with virat kohli in india vs new zealand 3rd odi see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक एक विक्रम अनेक! रोहित बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा सक्रिय खेळाडू
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय






