भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने गुरुवारी (15 ऑगस्ट) बुची बाबू स्पर्धेदरम्यान विकेटच्या मागे एक उत्कृष्ट झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बऱ्याच काळापासून क्रिकेटमधून दूर असूनही ईशान चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. या स्पर्धेत तो झारखंडचे नेतृत्व करत आहे. ईशान गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे आणि पुनरागमनासाठी जोरदार तयारी करत आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा असलेल्या बुची बाबू स्पर्धेत झारखंड संघाचे नेतृत्व करताना ईशान किशनने आपल्या विकेटकीपिंगने मोठा प्रभाव पाडला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, इशान विकेटच्या मागे एक शानदार झेल घेताना दिसत आहे, ज्याने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केले आहे.
Our kaptaan sahab took 3 superb catches today & JK bowlers conceeded only 225 runs in 90 overs with 8 wickets 😎💯#BuchiBabuTournament pic.twitter.com/kdXLvhuT1k
— RS (@vividrs18) August 15, 2024
ईशानने गेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम टप्प्यात खेळण्यास नकार दिल्याने त्याचे राष्ट्रीय संघात पुनरागमन रोखले होते. ईशान गेल्या वर्षीपर्यंत भारताच्या तीनही फॉरमॅटचा भाग होता. मात्र त्याच्या एका निर्णयामुळे तो सर्व फाॅरमॅटमधून बाहेर पडला आहे. इंडियन प्रीमियर लीगला प्राधान्य दिल्याने आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत न खेळल्यामुळे विकेटकीपर ईशान किशनला बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले.
बुची बाबू स्पर्धेत ईशान प्रथमच लाल चेंडूचे क्रिकेट खेळत असून चांगली कामगिरी करत आहे. फलंदाजी करताना देखील शानदार शतक ठोकले आहे. त्याने 107 चेंडूत 114 धावा केल्या.
हेही वाचा-
बांग्लादेशकडून महिला टी20 विश्वचषकाचे यजमानपद हिसकावले जाणार, या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता
“भारत भाग्यवान आहे…” माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केंद्रीय करार नाकारलेल्या खेळाडूंबद्दल दिली परखडं प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या दिग्गजानं सांगितले जगातील दोन आवडते खेळाडू, दोन्हीही भारतीयचं!