साउथॅंप्टन | भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हा सामना रोझ बोल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नाही.
सध्या इंग्लंड संघाच्या ९.४ षटकांत २ बाद २१ धावा झाल्या आहेत. जे दोन फलंदाज बाद झाले आहेत त्यातील कर्णधार जो रुटला १४ चेंडूत ४ धावांवर इशांत शर्माने तर केव्टाॅन जेनिंग्जला जसप्रित बुमराहने भोपळाही न फोडता बाद केले.
रुट हा इशांतचा कसोटी कारकिर्दीतील २५०वा शिकार ठरला. आपल्या ८६व्या सामन्यात इशांतने २५० विकेट्स घेण्याचा हा पराक्रम केला. जगात अशी कामगिरी केवळ ४३ गोलंदाजांना जमली आहे.
भारताकडून २५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो ७वा गोलंदाज ठरला. तर कपील देव (४३४) आणि झहीर खान (३११) यांच्यानंतर हा टप्पा पार करणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
याबरोबर त्याने कसोटीत इंग्लंड संघाविरुद्ध ५० विकेट्सचा टप्पाही पार केला. या ५० विकेट्सपैकी ३७ त्याने इंग्लंडमध्ये तर १३ भारतात मिळविल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध ५० विकेट्स घेणारा तो जगातील ७६वा तर ७वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
कसोटीत २५० विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-
६१९- अनिल कुंबळे, सामने- १३२
४३४- कपील देव, सामने-१३१
४१७- हरभजन सिंग, सामने- १०३
३२४- आर अश्विन, सामने- ६२
३११- झहीर खान, सामने- ९२
२६६- बिशनसिंग बेदी, सामने- ६७
२५०- इशांत शर्मा. सामने- ८६
महत्त्वाच्या बातम्या-
– फक्त या कारणामुळे टीम इंडिया होते कायम पराभूत
– टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू
– चौथ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया
– भारत दौऱ्यासाठी विंडीज संघाची घोषणा
– पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा
–भारत- पाकिस्तान नाही… आशिया खंडाचा खरा किंग तर अफगाणिस्तानच