fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टाॅप ७- कारकिर्दीत १६० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारे खेळाडू

मुळातच शंभर कसोटी सामने खेळणे ही अवघड गोष्ट समजली जाते. फारच थोड्या खेळाडूंना १०० कसोटी सामने खेळण्याचे भाग्य लाभते. खेळाडूने १०० कसोटी सामने खेळले म्हणजे तो त्या देशाचा मोठा खेळाडू ठरतो. त्याकडे एका वेगळ्याचं आदराने पाहिले जाते.

क्रिकेट जगतात केवळ ७ खेळाडूंनी १६० किंवा अधिक कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील २ भारतीय, २ ऑस्ट्रेलियन, दक्षिण आफ्रिका, विंडीज व इंग्लंडचा प्रत्येकी १ खेळाडू आहे.

सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने २०० कसोटी सामने खेळले आहेत.

कोणत्याही पुर्णवेळ गोलंदाजाने कारकिर्दीत १६० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले नाहीत.

जॅक कॅलिस हा एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने कसोटीत १६६ सामने खेळले आहेत. भारताकडून सचिन (२००) आणि राहुल द्रविड (१६४) यांनी सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू-

२००- सचिन तेंडूलकर

१६८- रिकी पाॅटिंग

१६८- स्टिव वाॅ

१६६- जॅक कॅलिस

१६४- राहुल द्रविड

१६४- शिवनारायण चंद्रपाॅल

१६१- अॅलस्टेर कूक

ट्रेंडिंग घडामोडी-

-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू

-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात

-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू

You might also like