भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याला त्याच्या तुफानी गोलंदाजीसाठी ओळखले जाते. आयपीएलमधून नावारूपाला आलेला उमरान सध्या भारतीय संघात खेळताना दिसून येतो. सातत्याने 150 किमी प्रतितास इतक्या वेगाने गोलंदाजी करण्याचा त्याचा हातखंडा आहे. कधीतरी अधिकच्या वेगाच्या प्रयत्नात तो महागडा देखील ठरतो. त्यामुळे त्याच्यावर अनेकदा टीका होते. मात्र, भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांनी त्याला टीकेकडे लक्ष न देता फक्त वेगात चेंडू टाकण्याचा सल्ला दिला आहे.
ईशांतने नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यामध्ये त्याला वर्तमान भारतीय संघातील खेळाडूंबद्दल प्रश्न विचारण्यात आले. उमरान मलिक याच्याबद्दल विचारले असता तो म्हणाला,
“त्याच्यामध्ये एक मोठा गोलंदाज होण्याची सर्व क्षमता आहे. त्याला सल्ला द्यायचा झाल्यास मी इतकेच सांगेल की, तुझ्याकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेने तू अधिकाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न कर. अधिकच्य धावा गेल्या तरी फारसा फरक पडत नाही. नेहमी आपल्या ताकदीवर प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असावा. जसा अनुभव येईल तसा चेंडू कुठे टाकायचा हे देखील समजून येते. त्याने 160 किमी प्रतितास वेगाचा चेंडू टाकला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.”
केवळ दोन आयपीएल हंगाम खेळल्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली होती. यादरम्यान त्याने सर्वांना प्रभावित केले. श्रीलंकेविरुद्ध त्याने 156 की मी प्रतितास वेगाचा चेंडू टाकल्यानंतर भारताकडून सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम नोंदवला होता. असे असताना महागडे ठरल्यामुळे त्याच्यावर काही वेळा टीका देखील होत असते. उमरान आगामी आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळताना दिसेल.
(Ishant Sharma Advice Umran Malik Said Bowl Fast As Much As You Can)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सॅमसनवर अन्याय होतोय का? वनडेत दर्जा कामगिरी करूनही संघ व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष
अखेर पेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती! कठीण काळात सांभाळलेले ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद