---Advertisement---

मोठी बातमी! मुंबई कसोटीतून रहाणे, इशांत, जडेजा, विलियम्सन बाहेर; ‘हे’ आहे कारण

On: शुक्रवार, डिसेंबर 3, 2021 10:07 AM
---Advertisement---

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शुक्रवारपासून(३ डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात होत आहे. मात्र, हा सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचे तीन प्रमुख खेळाडू या सामन्यातून बाहेर पडले आहेत. तसेच न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सनही या सामन्याला मुकणार आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापतींमुळे मुंबई कसोटीतून बाहेर व्हावे लागले आहे. बीसीसीआयने याबद्दल माहिती दिली आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार इशांत शर्माच्या करंगळीला पहिल्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबईत होत असलेल्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्यावर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

तसेच अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या उजव्या हाताला पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले असून त्यात त्याच्या हाताला सूज असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला विश्रांती करण्यास सांगितले असल्याने तो देखील मुंबई कसोटीसाठी उपलब्ध नसेल.

याशिवाय अजिंक्य रहाणेला कानपूरला झालेल्या पहिल्या कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करताना डाव्या हॅमस्ट्रिंगचा थोडा त्रास झाला होता. त्यानंतर तो पूर्णपणे दुखापतीतून सावरला नसल्याने त्याला मुंबईत होणाऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या दुखापतीवर देखील बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

विलियम्सनही मुंबई कसोटीतून बाहेर
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार केन विलियम्सन मुंबई कसोटीसाठी उपलब्ध नसेल. त्याला गेल्या अनेक दिवसांपासून सतावणाऱ्या कोपराच्या दुखापतीने पुन्हा डोकं वरती काढले असल्याने तो मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही. त्याच्याऐवजी टॉम लॅथम न्यूझीलंड संघाचे नेतृत्त्व करेल.

कानपूर कसोटी अनिर्णित 
कानपूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला विजयाची संधी होती, मात्र अखेरच्या दिवशी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अखेरच्या विकेटसाठी दिलेल्या झुंजीमुळे हा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सध्या मालिकेत ०-० अशी बरोबरी आहे. त्यामुळे मुंबईत होणारा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो मालिका विजेता असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आठवणींना संपूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन”, मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पंड्या भावुक; पाहा व्हिडिओ

दुसऱ्या सामन्यापूर्वी वृद्धिमान साहाच्या फिटनेसबद्दल विराटचे मोठे वक्तव्य, साहाचा देखील खास मेसेज

“अगदी मनासारखे घडलेय”; रिटेन झाल्यावर आली ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---