भारतीय क्रिकेटमध्ये झहीर खान व ईशांत शर्मा यांना वेगवान गोलंदाजीतील दिग्गज मानले जाते. बरीच वर्षे एकत्र खेळल्यानंतर झहीरने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ईशांत अजूनही निवृत्त झाला नसला तरी तो भारतीय संघाचा भाग नाही. त्याचवेळी आता हे दोन्ही खेळाडू समालोचक म्हणून आपली सेकंड इनिंग सुरू करताना दिसत आहेत. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यावेळी नुकतीच या दोघांची एक आकडेवारी जाहीर झाली. ज्याची सध्या क्रिकेटवर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हे दोघे एकत्रित समालोचन करत असताना टीव्हीवर या दोघांची आकडेवारी दाखवण्यात आली. त्यामधील साम्य पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली.
त्या आकडेवारीनुसार या दोघांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 311 बळी मिळवले आहेत. दोघांनी देखील प्रत्येकी 11 वेळा पाच बळी तर प्रत्येकी एकदा सामन्यात दहा बळी घेण्याची कामगिरी केली. या दोघांनी देखील भारतात प्रत्येकी 104 बळी मिळवले. तर विदेशात दोघांच्याही खात्यावर प्रत्येकी 207 बळी आहेत.
या आकडेवारीनंतर सोशल मीडियावर अनेकांनी दोघांची तुलना करण्यास सुरुवात केली. तर, काहींनी ते दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ असल्याचे म्हटले. या दोघांच्या कसोटी सामन्यांचा विचार केल्यास झहीरने आपल्या कारकीर्दीत 93 कसोटी सामने खेळले होते. तर, ईशांतच्या नावे सध्या 105 कसोटी सामने आहेत. 34 वर्षांचा ईशांत मागील जवळपास वर्षभरापासून संघा बाहेर आहे. तसेच, युवा खेळाडू चांगली कामगिरी करत असल्याने त्याला पुनरागमनाची संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
(Ishant Sharma And Zaheer Khan Similar Test Stats Viral)
महत्वाच्या बातम्या –
‘ती खेळापेक्षा मोठी नाही, शिस्तभंगाची कारवाई करा’, विश्वविजेत्या खेळाडूची आयसीसीकडे मागणी
BREAKING! त्रिनिदादमध्ये शेवटच्या दिवशी पावसाची हजेरी! वेस्ट इंडीजसाठी चिंतेची बाब