---Advertisement---

दुखापतीमुळे हा खेळाडू आयपीएलच्या सामन्यांना मुकणार? फिजिओवर प्रश्नांचा भडीमार…

---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या (Ishant Sharma) घोट्याची दुखापत पुन्हा उद्भवली आहे. त्यामुळे आता तो आयपीएलचे (IPL)  सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. इशांतच्या या दुखापतीमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (National Cricket Academy) मुख्य फिजिओ आशिष कौशिकवरही (Ashish Kaushik) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जर इशांतला दुखापतीतून सावरण्यासाठी पुन्हा एनसीएमध्ये रिहॅबिलिटेशन प्रोग्रामसाठी जावे लागले तर तो आयपीएलचे सुरुवातीचे सामने तो खेळू शकणार नाही.

इशांत न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand vs India) पहिल्या कसोटी सामन्याच्या 72 तासांपूर्वी न्यूझीलंडमध्ये पोहचला होता. त्यानंतर त्याने या सामन्यात चमकदार कामगिरी करताना 5 विकेट्सही घेतल्या. मात्र त्यानंतर पुन्हा त्याच्या घोट्याच्या दुखापतीने डोके वर काढल्याने त्याला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले.

भारतीय संघ व्यवस्थापनाने इशांतच्या दुखापतीच्या निर्णयावर मौन बाळगले आहे. परंतु बीसीसीआयच्या सूत्रानुसार, इशांतच्या जखमेने पुन्हा तोंड वर काढले आहे.

इशांतला 20 जानेवारीला रणजी ट्रॉफीचा सामना खेळताना घोट्याची दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर होती. पण इशांत या दुखापतीतून 4 आठवड्यात सावरला. तसेच त्याने त्यासाठी फिटनेस टेस्टही दिली. या फिटनेस टेस्टमध्ये तो उत्तीर्ण झाल्याने पहिल्या कसोटीसाठी न्यूझीलंडला पोहचला होता. मात्र आता पुन्हा तो या दुखापतीचा सामना करत आहे.

“दिल्ली संघाच्या फिजिओने इशांतच्या दुखापतीच्या स्कॅन रिपोर्टच्या आधारे त्याला 6 आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. कारण ही तिसऱ्या दर्जाची दुखापत होती. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी इशांतला तीन आठवडे पुरेसा आहे, या निर्णयावर कौशिक आणि एनसीए टीम कशी काय आली.” असे बीसीसीआयच्या एका सूत्राने प्रश्न उपस्थित केला.

यावेळी इशांतने मीडियाशी बोलताना सांगितले की, त्याने एनसीएमध्ये 2 दिवसांत 21 षटके गोलंदाजी केली. त्यानंतर राष्ट्रीय संघात त्याला खेळण्यासाठी मान्यता मिळाली. तसेच इशांतने कौशिकबरोबर आपला फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ज्यामध्ये रिहॅबिलिटिशनसाठी एनसीएच्या भूमिकेची त्याने प्रशंसा केली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---