वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. आज(23 फेब्रुवारी) या सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्या डावात 183 धावांची आघाडी घेतली आहे. या डावात भारताकडून वेगवान गोलंदाज इशांत शर्माने शानदार कामगिरी करताना 5 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने 22.2 षटके गोलंदाजी करताना 68 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याची कसोटीमध्ये एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही 11 वी वेळ होती. त्यामुळे त्याने भारताकडून कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झाहिर खानची बरोबरी केली आहे.
झहिरनेही 92 कसोटी सामने खेळताना 11 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता या विक्रमाच्या यादीत इशांत आणि झहिर संयुक्तरित्या 8 व्या क्रमांकावर आले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे आहे. त्याने 35 वेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इशांत व्यतिरिक्त आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तसेच त्यापूर्वी भारताचा पहिला डाव 165 धावांवरच संपुष्टात आला आहे.
कसोटीत सर्वाधिकवेळा एका डावात 5+ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
35 – अनिल कुंबळे (132 सामने)
27 – आर अश्विन (71 सामने)
25 – हरभजन सिंग 103 सामने)
23 – कपिल देव 131 सामने)
16 – भगवत चंद्रशेखर 58 सामने)
14 – बिशनसिंग बेदी 67 सामने)
12 – सुभाष गुप्ते 36 सामने)
11 – झहिर खान (92 सामने)
11 – इशांत शर्मा (97 सामने)
10 – इरापल्ली प्रसन्ना (49 सामने)
10 – जवागल श्रीनाथ (67 सामने)
…म्हणून भारतीय फलंदाजी गडगडली, मयंक अगरवालचा खूलासा
वाचा- 👉https://t.co/kEpNCbrv5h👈#म #मराठी #cricket @mayankcricket— Maha Sports (@Maha_Sports) February 22, 2020
६ फूट ८ इंच उंची असणारा जेमिसन म्हणतो, 'विराटला आऊट करणे माझ्यासाठी…'
वाचा- 👉https://t.co/WZq06MCfn9👈#म #मराठी #cricket @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) February 22, 2020