भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांबाबत जेव्हा कधी बोलले जाते, तेव्हा झहीर खान याचे नाव नक्कीच घेतले जाते. झहीर भारतीय क्रिकेट संघाच्या काही सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश गोलंदाजांचे स्वप्न असते की, 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करता यावा. भारताच्या महान गोलंदाजांपैकी एक असला, तरी झहीरला देखील 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करता आला नाहीये. इशांन शर्माने झहीरला 100 कसोटी सामने खेळता न येण्यामागचे कारण सांगितले.
झहीर खान (Zaheer Khan) भारताला वनडे विश्वचषक 2011चे विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज राहिला होता. त्याने या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. फक्त वनडे क्रिकेटमध्येच नाही, तर झहीरने कसोटी क्रिकेटमध्येही भल्या भल्या फलंदाजांना घाम फोटडा. त्याने कसोटी कारकिर्दीतील 92 सामन्यांमध्ये 311 विकेट्स घेतल्या. एका डावात 87 धावा खर्च करून 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम आकडेवारी राहिली आहे. त्याने एखा डावात 5 विकेट्सची कामगिरी 11 वेळा, तर 15 वेळा चार विकेट्सची कामगिरी केली आहे. अशे असले तरी, झहीर 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करू शकला नाही.
इशांत शर्मा (Ishant Sharma) याने यामागचे कारण स्पष्ट करताना एख गमतीशीर किस्सा सांगितला. जिओ सिनेमावर बोलताना इशांत शर्मा म्हणाला, “आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खेळत होतो. विराट कोहली कोहलीने झेल सोडल्यानंतर ब्रँडन मॅक्युलमने 300 धावा केल्या होत्या. मला लक्षात आहे हा प्रसंग लंचदरम्यान झाला होता. विराटने झॅकची (झहीर खान) माफी मागितली आणि झॅक म्हणला, काहीच अडचण नाही. आपण त्याला बाद करू. चहापाणावेळा विराटने पुन्हा एकदा झहीरची माफी मागितली. झहीर यावेळीही म्हणाला चिंतेची बाब नाही. चहापाणावेळी विराटने दुसऱ्यांदा माफी मागितल्यानंतर झहीर म्हणाला तू माझी कारकीर्द संपवली.”
इशांत शर्माने हा किस्सा सांगितल्यानंतर झहीरने आपली प्रतिक्रिया दिली. माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, “मी असे म्हटलो नव्हतो. मी त्याला म्हटलो की, फक्त दोन खेळाडू असे झाले आहेत, ज्यांनी झेल सुटल्यानंतर 300 धावा केल्या आहेत. किरन मोरे यांनी ग्राहम गूच यांचा झेल सोडल्यानंतर त्यांनी 300 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता विराटने कोहली आहे, ज्याने झेल सोडल्यानंतर फलंदाजाने 300 धावा केल्या आहेत. त्यानंतर विराट मला म्हणाला, तू असे नको बोलूस. साहजिक आहे त्याला याविषयी वाईट वाटत होते. कारण झेल सुटल्यानंतर खूप धावा झाल्या होत्या.” (Ishant Sharma Explains Why Zaheer Khan Can’t Play 100 Tests)
महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे
शेवटच्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइगं इलेव्हन जाहीर, संघ पाहून क्रिकेटप्रेमींना धक्का!