---Advertisement---

कसोटी चँपियनशीप पराभवाच्या जखमेनंतर टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

On: शुक्रवार, जून 25, 2021 10:15 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड संघाने भारतीय संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला १३९ धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलयमसन आणि रॉस टेलर यांनी नाबाद ९५ धावांची भागिदारी करत भारताला पराभवाचे पाणी पाजले. अंतिम सामना गमावल्यानंतर आता भारतीय संघासाठी अजून एक वाईट बातमी पुढे आली आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.

अंतिम सामन्याचा शेवटच्या दिवशी गोलंदाजी करत असताना इशांत शर्माला दुखापत झाली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजाने मारलेला स्ट्रेट ड्राइव चेंडू अडवण्याचा नादात इशांतच्या बोटाला मार बसला आणि त्याच्या बोटाला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर तो मैदान सोडून बाहेर गेला होता.

बीसीसआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे की, “इशांतच्या बोटाला जास्त दुखापत झाल्याने त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्याच्या बोटाला २ टाके पडले आहेत. परंतु, त्याची दुखापत जास्त गंभीर नसल्याने १० दिवसात ते टाके काढण्यात येतील. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या अगोदर इशांत फिट होईल असा अंदाज आपण ठेऊ शकतो.”

इशांतला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भेदक मारा करता आला नाही. त्याने एकच टप्पा पकडून गोलंदाजी केली. त्याचा गोलंदाजीमध्ये वेगळेपणा दिसून आला नाही. परिणामी तो पूर्ण सामन्यात फक्त ३ विकेट्स घेऊ शकला.

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ गुरुवारी (२४ जून) साउथम्पटनवरून लंडनला रवाना झाला आहे. दरम्यान जैव सुरक्षित वातावरणात राहिल्याने खेळाडू मानसिकरित्या आणि शारीरिकरीत्या थकल्यामुळे त्यांना काही दिवसांसाठी सुट्टी (जैव सुरक्षित वातावरणाबाहेर जाणे) दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर १४ जुलैला सर्व खेळाडू एकत्र जमतील. खेळाडूंना ब्रिटेनमध्येच सुट्टी मिळणार आहे. त्यांना तिकडे बाहेर फिरण्याची आणि कुटुंबीयांसोबत सुट्टी घालवण्याची परवानगी दिली गेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूला दुहेरी धक्का, पीएसएल अंतिम सामन्याबरोबर २ आंतरराष्ट्रीय मालिकेतूनही बाहेर

भारताच्या हारकिरीनंतर चाहत्यांचा शास्त्रींवर निशाणा, द्रविडला प्रशिक्षक बनवण्याच्या मागणीने धरला जोर

नवी सुरुवात! आगामी कसोटी चँपियनशीपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर, भिडणार ‘या’ संघांशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---