क्रिडा मंत्रालयाच्या पुरस्कार निवड समितीने यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी ज्या २९ खेळाडुंची शिफारस केली आहे त्यात भारतीय गोलंदाज इशांत शर्माचा समावेश आहे. इशांत शर्मा सोबतच तिरंदाज अतनु दास, महिला हॉकी खेळाडु दिपीका ठाकुर, क्रिकेटर दिपक हुड्डा व टेनिसपटू दिविज शरणच्या नावाची शिफारस सुद्धा या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
३१ वर्षीय इशांत शर्माने आतापर्यंत ९७ कसोटी, ८० एकदिवसीय व १४ टी-२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने एकूण ४१५ बळी मिळवले आहेत.
खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्मासह ४ खेळाडुंची शिफारस
भारताच्या एकदिवसीय व टी-२० संघाचा उपकर्णधार रोहीत शर्मा पाठोपाठ कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिस खेळाडु मनिका बत्रा आणि पॅरालंपिकमध्ये उंच उडीतील सुवर्ण पदक विजेता मरियप्पन थंगावेलुची यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.