भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल असे म्हटले जाते की तो मैदानावर खूप कमी बोलतो. तसेच त्याला रागही फार कमीवेळा येतो. तणावाच्या परिस्थितीत शांत राहणे आणि आपले नियंत्रण न सोडण्यामुळेच धोनीला ‘कॅप्टन कूल’ असे म्हटले जाते. परंतु अनेकवेळा अशी काही परिस्थिती निर्माण झाली, ज्यामध्ये धोनी मैदानावर रागावताना दिसला आहे.
धोनीला (MS Dhoni) जेव्हाही राग येतो, तेव्हा तो वेगळ्याच रुपात दिसतो. याबद्दल भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने (Ishant Sharma) खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, आयपीएलच्या (IPL) एका सामन्यादरम्यान धोनी त्याच्यावर चिडला होता. यानंतर त्याने जडेजाच्या चेंडूवर षटकार आणि चौकार ठोकल्यानंतर धोनी जडेजावर रागावला होता. Dhoni gets angry on Jadeja
गौरव कपूरच्या (Gaurav Kapur) एका कार्यक्रमात इशांतने याबद्दल सांगितले की, “जडेजाच्या चेंडूवर षटकार मारण्यापूर्वी धोनी मला चिडवत होता. तसेच तो म्हणत होता की, मी कधीच षटकार मारू शकत नाही. धोनीच्या या वक्तव्याने मला जडेजाच्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी प्रेरित केले. त्यावेळी मी जडेजाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आणि नंतर षटकार ठोकला होता.”
“यानंतर मी यष्टीमागे थांबलेल्या धोनीकडे पाहिले. धोनी जडेजावर निराश झाला होता,” असेही इशांत यावेळी म्हणाला.
इशांत ज्या सामन्याबद्दल बोलत होता, तो सामना मागील वर्षी झालेल्या आयपीएलमधील दुसऱ्या पात्रता फेरीतील होता. या सामन्यात जेव्हा इशांत फलंदाजीला आला होता, तेव्हा केवळ ३ चेंडू शिल्लक राहिले होते. यावेळी इशांतने त्याच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव घेतली नव्हती. यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने ९ बाद १४७ धावा केल्या होत्या. दिल्लीच्या १४८ धावांचे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) ४ बाद १५१ धावा करत पूर्ण केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियात निवड न झाल्याने रात्रभर रडला होता विराट, या व्यक्तीला विचारली होती कारणं
-कॅप्टन कूल धोनी पुन्हा कर्णधार, टीम इंडिया नाही तर संघात मिळाली संधी
-फक्त या दोन गोलंदाजांमुळे मोहम्मद शमीचं करियरच गेलं बदलुन