इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर झाला. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यातील शेवटच्या दिवशी देखील (१६ ऑगस्ट) भारतीय गोलंदाजांचा दबदबा राहिला. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती. पण, इंग्लंडचा संघ १२० धावांवर सर्वबाद झाला.
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रुट या डावातही पहिल्या डावा प्रमाणेच चिवट फलंदाजी करेल, असे एका क्षणी वाटत असतानाच तो ३३ धावांवर बाद झाला. त्याच्या विकेटमुळे इंग्लंड संघाला पूर्णपणे बॅकफूटवर गेला. त्याची विकेट घेतल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश दिसला.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी(१६ ऑगस्ट) भारतीय संघ हा सामना गमावणार असे चित्र दिसून येत होते. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी मिळून तुफान फटकेबाजी करत इंग्लिश गोलंदाजांचा घाम काढला होता. दोघांनी मिळून भारतीय संघाला २९८ धावांपर्यंत पोहचवले होते. त्यामुळे इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती.
कर्णधारानेच टिपला कर्णधाराचा झेल
धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघातील फलंदाजांना साजेशी सुरुवात करण्यात अपयश आले होते. परंतु, पहिल्या डावातील शतकवीर फलंदाज जो रूटने या डावात देखील एकहाती झुंज दिली. पण ही झुंज फारकाळ टिकू शकली नाही. २३ व्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने त्याला बाद करत माघारी धाडले होते.
बुमराहने ऑफसाईडच्या दिशेने गुड लेंथ चेंडू टाकला.जो बॅटचा कडा घेत स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. विराटने ही कुठलीही चूक न करता झेल टिपला. यानंतर विराट प्रचंड आनंदात दिसला. त्याने झेल घेतल्यानंतर मोठा जल्लोषही केला. (Ishant Sharma sent back joe root to the pavelian watch video)
Huge wicket for India as the captain goes.
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 | #RedForRuth pic.twitter.com/SmnASYJDnW
— England Cricket (@englandcricket) August 16, 2021
भारतीय गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी फलंदाजीमध्ये मोलाचे योगदान दिल्यानंतर गोलंदाजीमध्येही संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. त्याने रॉरी बर्न्सला भोपळाही न फोडता माघारी धाडले होते. तसेच डोम सिब्लेला देखील मोहम्मद शमीने ० धावांवर माघारी धाडले होते.
त्यानंतर कर्णधार जो रूटने हमीद सोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही जोडी ही फार काळ टिकू शकली नाही. ईशांत शर्माने हमीदला ९ धावांवर माघारी धाडले त्यानंतर जॉनी बेअरस्टोला देखील अवघ्या २ धावांवर माघारी धाडले होते. कर्णधार जो रूटवर हा सामना पुढे घेऊन जायची जबाबदारी होती. परंतु, तो देखील फार काळ टिकू शकला नाही. तो ३३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेला जोस बटलर एकहाती झुंज देताना दिसून आला. मात्र, त्यालाही सिराजने माघारी धाडले आणि अखेरीस सिराजने अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव संपवला.