---Advertisement---

इशांत शर्माचा ‘यू टर्न’! आयपीएलमध्ये नाही मिळाला खरेदीदार, आता ‘या’ रणजी संघाचे करणार प्रतिनिधित्त्व

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 9:31 PM
ishant sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (ishant sharma) रणजी ट्रॉफी २०२२ (ranji trophy 2022) मध्ये खेळताना दिसणार आहे. तो दिल्ली रणजी संघासाठी खेळणार आहे. इशांत संघासाठी पहिला सामना खेळणार नाही, पण दुसऱ्या सामन्यापासून तो उपस्थित असेल. त्याआधी त्याला पाच दिवसाचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागेल. यापूर्वी इशांतने सांगितले होते की, तो रणजी ट्रॉफी खेळणार नाहीय. परंतु आयपीएल मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही आणि त्यानंतर इशांतने स्वतःचा निर्णय बदलल्याचे दिसत आहे.

दिल्ली संघाला त्यांचा पहिला रणजी सामना १७ फेब्रुवारीला तामिळनाडूविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात इशांत शर्मा उपस्थित राहू शकणार नाही, कारण तो विलगीकरणात असेल. २४ फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या झारखंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात इशांत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

आयपीएल २०२२ पूर्वी बीसीसीआयने १२ आणि १३ फेब्रुवारील मेगा लिलाव आयोजित केला होता. मेगा लिलावात इशांत शर्मावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही आणि तो अनसोल्ड राहिला. त्याच पार्श्वभूमीवर इशांतने रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली रणजी संघाच्या एका विश्वसनीय सूत्राने यासंदर्भात पीटीआयला सांगितेल की, “इशांत आज येत आहे. तो दुसऱ्या सामन्यापासून उपस्थित असेल. अधिक चांगले झाले असते, जर दोन्ही वेगवान गोलंदाज पहिल्या सामन्यापासून संघासोबत असते, परंतु त्याचे स्वागत आहे आणि त्याच्यामुळे संघ मजबूत बनेल.”

हेही वाचा- मोठी बातमी! मुंबई कसोटीतून रहाणे, इशांत, जडेजा, विलियम्सन बाहेर; ‘हे’ आहे कारण

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात मायदेशातील कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या कसोटी मालिकेतही इशांतला संधी मिळण्याची खूप कमी शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---