आयपीएलचा 12 वा मोसम आता जवळ जवळ एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाहत्यांना आयपीएलचे सामने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहण्याचे वेध लागले आहेत. याचमुळे चाहत्यांनी खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना, सहकाऱ्यांना तिकीटांसाठी संपर्क साधणे सुरु केले आहे.
अशा गोष्टीमुळे आयपीएल हे चाहत्यांसाठी मजेची गोष्ट असली तरी क्रिकेटपटूंच्या कुटुंबासाठी त्रासदायक असल्याचे मत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची पत्नी आणि भारताची बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंगने मांडले आहे.
झाले असे की, एका चाहत्याने प्रतिमाला मेसेज करुन आयपीएलच्या तिकीटाची मागणी केली आहे. ज्याला प्रतिमाने उत्तरही दिले. या संवादाचा स्क्रिनशॉट प्रतिमाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
या स्क्रिनशॉटमध्ये दिसते की एका चाहत्याने प्रतिमाला विचारले आहे की ‘मॅडम सामन्याचे तिकीट मिळेल का?’ यावर प्रतिमाने उत्तर दिले आहे की ‘हो मिळेल ना, पेटीएमवर.’
त्याचबरोबर प्रतिमाने या स्क्रिनशॉटच्या पोस्टवर लिहीले आहे की ‘जगासाठी आयपीएल हा मजेचा काळ असतो. पण क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा त्रासदायक काळ असतो. लोक तिकीट मागण्यासाठी फोन करतील, तिकीट्स, तिकीट्स, तिकीट्स.’ याचबरोबर या पोस्टमध्ये तिने इशांत शर्मा आणि काही खास मित्र-मैत्रिणींना टॅग केले आहे.
https://www.instagram.com/p/BuAtyd_g_Gb/
इशांत यावर्षी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. तो मागीलवर्षी लिलावात कोणत्याच संघाने पसंती दाखवली नसल्याने तो आयपीएल खेळला नव्हता. पण यावर्षी दिल्ली आणि राजस्थान रॉयल्समध्ये त्याला संघात घेण्यासाठी लिलावादरम्यान स्पर्धा पहायला मिळाली होती. अखेर दिल्लीने त्याला 1.1 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामील करुन घेतले.
यावर्षीचा आयपीएल मोसम 23 मार्चपासून सुरु होणार असून पहिल्या दोन आठवड्यातील 17 सामन्यांचे वेळापत्रकही काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहे. यावर्षी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सलामीचा सामना रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–इशान किशनची कमाल, धोनीला न जमलेला विक्रम केला नावावर
–तब्बल ९ फलंदाज झाले ० धावेवर बाद, संघाचा स्कोर किती झाला पहाच
–युवराज सिंगच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी