---Advertisement---

दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर; या खेळाडूला मिळाले स्थान

On: मंगळवार, सप्टेंबर 24, 2024 4:05 PM
---Advertisement---

सध्या श्रीलंका क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या सर्कल ​​अंतर्गत आपल्या घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघाचा पाहुणचार करत आहे. म्हणजेच दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका (SL vs NZ) खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता दोन्ही संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी 26 ते 30 सप्टेंबरदरम्यान गाले येथे खेळवली जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी वाईट परिस्थिती निर्माण झाली असून श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज विश्व फर्नांडो या सामन्यातून बाहेर पडला आहे.

पहिल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या विश्व फर्नांडोला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला आहे. या कारणास्तव तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असणार नाही. सरावादरम्यान फर्नांडोला उजव्या हाताला हॅमस्ट्रिंगचा आला. आता या वेगवान गोलंदाजाला हाय परफॉर्मन्स सेंटर रिहॅबिलिटेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. फर्नांडोने ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध श्रीलंकेच्या नेत्रदीपक विजयात मोलाची भूमिका बजावली होती. ज्यामध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता तो न खेळताच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. या वेगवान गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 32.71 च्या सरासरीने 71 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसऱ्या कसोटीपूर्वी विश्वा फर्नांडोची दुखापत ही ऑफस्पिनर निशिन पॅरिससाठी संधी ठरली असून त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. पॅरिस अद्याप अनकॅप्ड आहे. त्याने संघासाठी आणखी पदार्पण केलेले नाही. मात्र याआधी तो बांग्लादेश दौऱ्यावरही श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. पॅरिसने 41 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 24.37 च्या सरासरीने 172 बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत त्याचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. आता या युवा गोलंदाजाला पदार्पणाची संधी मिळते की नाही हे पाहणे रंजक ठरेल.

हेही वाचा-

“बीसीसीआयकडून शिका”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा पीसीबीवर हल्लाबोल
आयसीसीची मोठी घोषणा; पहिल्यांदाच टी20 विश्वचषकसाठी, महिला अंपायर आणि मॅच रेफरी
14 चौकार, 5 षटकार; ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध नाशिकच्या साहिल पारखची झंझावाती शतकी खेळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---