दिल्ली डायनामोजने बार्सिलोना युवा क्लबचे माजी प्रशिक्षक जोसेफ गोंबोऊ यांच्यासोबत दोन वर्षाचा करार केला आहे. आधीचे प्रशिक्षक मिगेल एन्जल पोर्तुगाल यांनी या वर्षीच मे महिन्यात हे पद रिक्त केले होते.
42 वर्षीय गोंबोऊ हे स्पेनमधील असुन त्यांनी 16व्या वर्षीच प्रशिक्षकाच्या सरावाला सुरूवात केली. 2003मध्ये ते युवा बार्सिलोना संघाचे प्रशिक्षक बनले. याआधी ते अमपोस्टा फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक होते.
दिल्लीचे प्रशिक्षकपद मिळाल्याबद्दल गोंबोऊ यांनी ट्विटवरही आपल्या भावना व्यक्त केल्या.
“मी खुप आनंदी आहे. हा संघ विजयासाठी नेहमीच तयार असतो. आपण लवकरच भेटू”, असे त्यांनी म्हटले आहे.
“तसेच आशियातील फुटबॉल हे काही माझ्यासाठी नवीन नाही, म्हणून मी नवीन आव्हानांसाठी तयार आहे”,असेही म्हटले आहे.
I am delighted to have joined @DelhiDynamos in the ISL. This is a club that is hungry for success and I can't wait to get started. See you all at the Den. #RoarWithTheLions pic.twitter.com/WX8BM4pmcV
— Josep Gombau (@GombauJosep) August 2, 2018
गोंबोऊ यांनी 2009मध्ये हाँग काँगमधील किटछी सॉकर क्लबचे प्रशिक्षक पद चार वर्षे सांभाळले आहे. या चार वर्षांत त्यांनी संघाला हाँग काँग फर्स्ट डिविझन लीग आणि हाँग काँग लीग कप जिंकून दिला आहे.
तसेच 2016 मध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुरूष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. यावेळी ते 23 वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकही होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–फुटबॉलच्या नियमांमध्ये मोठे बदल; प्रशिक्षकांची होणार पंचाईत
–नेमारची आई म्हणते,’भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे